आता ट्विंकल खन्नानेही केली नरेंद्र मोदींची कॉपी?

बॉलिवूड अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ट्विंकल एका पुतळ्याच्या बाजूला ध्यान साधना करत बसलेली दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 03:37 PM IST

आता ट्विंकल खन्नानेही केली नरेंद्र मोदींची कॉपी?

मुंबई, 20 मे- बॉलिवूड अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ट्विंकल एका पुतळ्याच्या बाजूला ध्यान साधना करत बसलेली दिसत आहे. ट्विंकलने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्हीही साइनअप करा. गेल्या काही दिवसांपासून मी एवढे आध्यात्मिक फोटो पाहत आहे की, आता मी मेडिटेशन फोटोग्राफी- पोजेस अँड अँगल्सवर वर्कशॉपची सीरिज सुरू करणार आहे. मला वाटतं की वेडिंग फोटोग्राफीनंतर आता हेही फार प्रसिद्ध होणार आहे.’

ट्विंकल खन्ना नेहमी तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि ट्वीटमुळे ती चर्चेत असते. यावेळीही तिने जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्या फोटोची तुलना नरेंद्र मोदींच्या फोटोशी केली जात आहे. अनेकांनी तिला मोदींवरूनच प्रतिक्रिया दिल्या.


नेटकरांनी ट्विंकलचं कॅप्शन वाचल्यानंतर त्याचा थेट संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ यात्रेशी जोडला. या यात्रेत मोदींनी केदारनाथ येथील गुंफेत ध्यान करत बसले होते. त्यांचे ध्यानसाधनेचे फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेकांनी ट्विंकलवर निशाणा साधत तिची थट्टा उडवण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या युझरने अक्षय कुमारला पोस्टमध्ये टॅग करत ‘आम्हाला तुम्ही फार आवडता. पण, तुमची पत्नी कधी कधी फार त्रास देते.’

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत मोदींनी अक्षयच्या घरी जी शांती आणि समाधानाचं श्रेय घेतलं होतं. त्यांच्या मते ट्विंकल तिचा सर्व राग सोशल मीडियामार्फत मोदींवर काढते.

Loading...

VIDEO: मतदानासाठी जाताना किरण खेर अडखळून पडल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...