मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

गुढीपाडव्याची घाटी विकण्यासाठी आलेल्या तरुणाची हत्या, भर रस्त्यात केले वार

गुढीपाडव्याची घाटी विकण्यासाठी आलेल्या तरुणाची हत्या, भर रस्त्यात केले वार

किरकोळ कारणावरून 20 वर्षीय युवकाचा शहरातील गुजरी बाजार भागात खून केला. सोमनाथ आळणे असं युवकाचं नाव आहे.

परभणी, 04 एप्रिल : एकाच आठवड्यामध्ये खुणाच्या दुसऱ्या घटनेनं परभणीत खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणातून 20 वर्षीय युवकाचा शहरातील गुजरी बाजारात खून झाला आहे. भर बाजारात युवकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत.

किरकोळ कारणावरून 20 वर्षीय युवकाचा शहरातील गुजरी बाजार भागात खून केला. सोमनाथ आळणे असं युवकाचं नाव आहे. त्याने गुढीपाडव्यासाठी विक्री करण्यात येणाऱ्या साखरेच्या घाटीचं दुकान लावलं होतं. त्यावरून त्याचा किरकोळ वाद झाला. या वादाचं रुपांतर खुनामध्ये झालं.

भर रस्त्यात हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसरात चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सोमनाथचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

तर हत्येचं नेमकं कारण आणि आरोपी शोधण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर अधिक तपासासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

SPECIAL REPORT : नांगरे पाटलांचं वर्दीच्या पलीकडचं काम, हे पाहुन तुम्हालाही कौतुक वाटेल!

First published:

Tags: Crime, Parbhani news