मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

चीनला 24 फोन कंपन्या देणार ‘स्मार्ट’ झटका, भारतात सुरु करणार नवे प्लांट

चीनला 24 फोन कंपन्या देणार ‘स्मार्ट’ झटका, भारतात सुरु करणार नवे प्लांट

सॅमसंग शिवाय फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगाट्रॉन यासारख्या कंपन्यांनी भारतात आपलं उत्पादन सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली 17 ऑगस्ट: कोरोना व्हायरसमुळे चीनला अनेक धक्के बसत आहेत. अनेक मोठ्या कंपन्या आता फक्त चीनवरच अवलंबून न राहता भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत. (India Investment)  24 स्मार्ट फोन कंपन्या या चीनल झटका देण्याच्या तयारीत असून त्यांनी भारतात आपलं उत्पादन सुरु करण्यासाठी बोलणीही सुरु केली आहे. (Smartphone Companies Making India Production Hub)

कोरोनामुळे चीनमध्ये परिस्थिती बिघडली आहे. चीनने जाणीवपूर्वक व्हायरस संदर्भातली माहिती दडविल्याच्या आरोप होत आहे. जगात चीनची प्रतिमा काळवंडली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय या कंपन्या घेत आहेत. त्याचा मोठा फटका चीनला बसण्याची शक्यता आहे.

सध्या भारत हा जगातला दुसरा मोठा मोबाईल उत्पादक देश आहे. देशात सध्या 300 मोबाईल उत्पादक कंपन्या काम करत आहेत. त्यात आणखी आता 24 कपन्यांची भर पडणार असून भारतात 1.5 बिलियन डॉलर म्हणजे 11 हजार 200 कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे हजारो रोजगार निर्माण होतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

....आणि रागाच्या भरात उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीनेच घेतला दुकानदाराचा चावा!

सॅमसंग शिवाय फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगाट्रॉन यासारख्या कंपन्यांनी भारतात आपलं उत्पादन सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान,  भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक निर्णय घेत चीनला आपला कडक विरोध दाखवून दिला आहे. चीन विरोधात भारतीय व्यापारी सर्वात मोठ निर्णय घेण्याच्या तयारीत असून येणाऱ्या सणा-सुदींच्या दिवसांना चिनी माल आयात करणार नसल्याचं The Confederation of All India Traders म्हणजेच CAIT ने म्हटलं आहे. CAIT 'भारताचं सामान-आमचा अभिमान' हे अभियान राबविणार असून त्यामुळे चीनला तब्बल 40 हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्यांपासून भारतात विविध सणांना सुरुवात होते. रक्षाबंधन, गौरी-गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्या दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठांमध्ये सगळ्यात जास्त खरेदी होते. गेल्या काही वर्षांमध्ये स्वस्त आणि आकर्षक असलेल्या चिनी मालांनी भारतीय बाजारपेठा काबीज केल्या होत्या. भारतीय व्यापारी हे चीनमधून हा माल आणत असल्याने भारतीय मालाला उठाव नव्हता.

महाराष्ट्रापेक्षा कमी असलेल्या या राज्याने 6 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

आता सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आणि केंद्र सरकाने घेतलेल्या अनेक निर्णयामुळे चीनला दणका बसला आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. त्यामुळे लोकांमध्येही चीन विरोधात भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आता भारतीय उत्पादकांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Smart phone