मुंबई,ता.16 एप्रिल: राज्य शासनाने प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. 25 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. शेखर चन्ने यांची परीवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीय. पुणे जिल्हाधिकारीपदी नवलकिशोर राम यांची बदली करण्यात आलीय, तर पुणे मनपा आयुक्तपदी सौरव राव यांची बदली करण्यात आलीय. पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली करण्यात आलीय. त्यांच्या बदलीची स्थानिक नगरसेवकांनी मागणी केली होती. केडगाव दुहेरी राजकीय हत्याकांडामुळे चर्चेत आलेल्या नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांचीही बदली करण्यात आलीय. तिथे आता राहूल द्विवेदी हे जिल्हाधिकारी पदाचा कारभार सांभाळणार आहेत.
अधिकारी आणि नव्या नियुक्त्या
शेखर चन्ने - परीवहन आयुक्त निवडणूक आयुक्त
नवलकिशोर राम - पुणे जिल्हाधिकारी
सुनिल चव्हाण - औरंगाबाद जिल्हाधिकारी.
सौरव राव - पुणे महापालिका आय़ुक्त
सुधाकर शिदे - मु्ख्य कार्यकारी अधिकारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
गणेश देशमुख - पनवेल महापालिका आयुक्त
अश्विन मुद्गल - नागपूर जिल्हाधिकारी
लक्ष्मी नारायण मिश्रा - वाशिम जिल्हाधिकारी.
राहूल द्विवेदी - अहमदनगर जिल्हाधिकारी,
आंचल गोयल - रत्नागिरी जिल्हापरिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी
एस एल माळी - नांदेड महापालिका आयुक्त.
माधवी खोडे चावरे - महिला आणि बालकल्याण आयुक्त
संजीव यादव - अकोला जिल्हाधिकारी
निरूपमा डांगे - बुलडाणा जिल्हाधिकारी
एस आर जोंधळे - मुंबई शहर आयुक्त.
एम जी अर्दाड - अहमदनगर महापालिका आयुक्त
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा