TVS ने लाँच केली Radeon; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत

Volcano Red आणि Titanium Grey अशा दोन रंगात बाइक उपलब्ध

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 07:56 PM IST

TVS ने लाँच केली Radeon; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत

नवी दिल्ली, 10 मे : TVS Motors ने TVS Radeon ही बाइक लाँच केली. रेडॉन Volcano Red आणि Titanium Grey अशा दोन रंगात 'टीव्हीएस'ने हा बाइक लाँच केली आहे. या बाइकची एक्स-शोरूम किंमत 50,070 रुपये आहे. दोन रंगांप्रमाणेच 4 कलर स्किम्समध्ये ही बाइक उपलब्ध आहे. त्यात पर्ल व्हाइट, मेटल ब्लॅक, रॉयल परपल आणि गोल्डन बेज याचा समावेश आहे. TVS ने 7 महीने अगोदरच ही बाइक भारतीय बाजारपेठेत उतरवली होती. तेव्हापासून Radeon चे 1 लाख युनिट विकल्या गेले आहेत.


असे आहेत फीचर्स - TVS Radeon मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, 3D क्रोम लोगो, सेल्फ स्टार्ट, USB चार्जिंग स्लॉट, साइड स्टँड इंडीकेटर, हेडलँपसह क्रोम बेजल आणि DRL सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. 60 कि.मी.चा वेग घ्यायला या बाइकला 8.34 सेकंद लागतात. या बाइकला 10 लीटरची इंधन टाकी लावण्यात आली आहे. 1 लीटर पेट्रोल मध्ये ही 69.3 किलोमीटर माइलेज देते.


TATA लवकरच लाँच करणार नवी SUV Blackbird; 'ही' आहेत फीचर्स आणिक किंमत

Loading...


इंजिनची क्षमता - TVS Radeon मध्ये पावरसाठी 109.7 सीसी चं ड्यूरा-लाइफ इंजिन लावण्यात आलं आहे, जे 7, 500 आरपीएम वर 9.5 bhp चा पावर आणि 5,000 आरपीएमवर 8.7 Nm चं पीक टॉर्क जेनरेट करतं. याकत 4-स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे.


इतर स्पेसिफिकेशन्स - बाइकचा समोरचा ब्रेक 130 मिलीमीटरचा असून, मागचा ब्रेक 110 मिलीमीटरचा आहे. SBT फीचरमुळे ब्रेक लावताच बाइक लगेच थांबते. रियर ब्रेक लागताच या बाइकचे फ्रंट ब्रेक ऑटोमॅटिक अॅडजेस्ट होतात. गाडीची लांबी 2006 मिलीमीटर, रूंदी 705 मिलीमीटर आणि ऊंची 1070 मिलीमीटर आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...