Khataron Ke Khiladi 9 च्या विजेत्याचा खुलासा, नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Khataron Ke Khiladi 9 च्या विजेत्याचा खुलासा, नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

हे स्टंट करताना आदित्य नारायणच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि विकास गुप्ताला सापाने चावलं होतं.

  • Share this:

टीव्हीचा नंबर एकचा शो खतरों के खिलाडी ९ च्या विजेत्याबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. नुकतंच विजेत्याचं नाव लीक झालं आहे.या शोचा अंतिम शोचं चित्रीकरण झालं असून नवव्या सीझनचा विजेताही घोषित झाला आहे. अर्जेंटिनामध्ये शेवटच्या एपिसोडचं चित्रीकरण संपलं आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये एकाहून एक सरस स्टंट पाहायला मिळणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, खतरों के खिलाडी सिझन ९ च्या अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध उभे राहिलेले शेवटचे तीन स्पर्धक हे पुनीत, आदित्य आणि रिद्धीमा असणार आहेत. हे तीघंच अंगावर शहारे आणणारे स्टंट करणार आहेत. हा एपिसोड फार रोमांचकारी असेल यात काही शंका नाही. यात एकाचवेळी भिती, आनंद, उत्साह, तणाव अशा सगळ्याच भावना पाहायला मिळणार आहेत.


शेवटचा सामना पुनीत, आदित्य आणि रिद्धीमा यांच्यात होणार असला तरी विजेता एकच होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुनीत या नवव्या पर्वाचा विजेता असणार आहे. पुनीतने आतापर्यंत प्रत्येक टास्कमध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे. आता या बातमीत किती तथ्य आहे हे तर येणारा काळच ठरवेल.

प्रत्येक वेळेनुसार यावेळीही फायनलचे टास्क रोहित शेट्टीने स्वतः प्लॅन केले आहेत. यावेळी सर्वात खतरनाक स्टंट डिझाइन करण्यात आले. हे स्टंट करताना आदित्य नारायणच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि विकास गुप्ताला सापाने चावलं होतं.

Loading...

'मेरे घर मे हैं मेरी बुढी माँ', शहीद नितीन राठोड यांच्या नावाने भावुक VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2019 03:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...