Khatron Ke Khiladi 9: अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी 'या' दोन अभिनेत्रींमध्ये झालं भांडण

Khatron Ke Khiladi 9: अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी 'या' दोन अभिनेत्रींमध्ये झालं भांडण

भारती आणि शमितामध्ये ऑन- स्क्रिन बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. भारती ‘खतरों के खिलाडी ९’ जिंकण्याच्या योग्यतेची नाही असं शमिता म्हणाली.

  • Share this:

मुंबई, २७ फेब्रुवारी २०१९- सध्या रोहित शेट्टीचा खतरों के खिलाडी ९ हा रिअलिटी शो टीआरपी रॅकिंगमध्ये अग्रणी आहे. प्रत्येक विकएण्डला या शोमध्ये नवे ट्विस्ट आणि टर्न असतात. एकीकडे अंतिम सामना जवळ येत आहे तर दुसरीकडे स्टंट अधिकाधिक कठीण होत चालले आहेत. रोहितने या नवव्या सिझनचे स्टंट स्वतः डिझाइन केले आहेत. ही स्पर्धा जिंकण्यासाठी आता प्रत्येक स्पर्धक ईर्शेला पोहोचला आहे. प्रत्येकालाच ही स्पर्धा जिंकायची आहे. यामुळेच शोमध्ये दोन अभिनेत्रींमध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली.

त्याचे झाले असे की, गेल्या काही एपिसोडपासून शमिता शेट्टी इतर स्पर्धकांपेक्षा अधिक चांगले परफॉर्म करत आहे. नुकताच तिने सर्वात कठीण टास्क पुर्ण करून ‘तिकीट टू फिनाले’ जिंकलं. आता ती सरळ फिनालेमध्येच टास्क करणार. ‘तिकीट टू फिनाले’मध्ये शमिताने पुनीत, आदित्य आणि अलीला मागे टाकत स्वतःचं अंतिम सामन्यात स्थान पक्क केलं.

यात भारती सिंगही काही कमी नाही. तिने अनेकांना मागे टाकत कठीण टास्कही जिंकले आहेत. पण आता भारती आणि शमितामध्ये ऑन- स्क्रिन बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. भारती ‘खतरों के खिलाडी ९’ जिंकण्याच्या योग्यतेची नाही असं शमिता म्हणाली. सर्वांसमोर शमिता हेही म्हणाली की, रोहित शेट्टीसोबत भारती फ्लर्ट करते. यावर प्रतित्युतर देताना भारती म्हणाली की, ‘मी शमिताला या शोमध्ये एक दिवसही सहन शकत नाही.’ नंतर या गोष्टी फक्त मस्तीमध्ये करत असल्याचं दोघांनी आमि इतर स्पर्धकांनी कबूल केलं.

याआधीही शमिता आणि भारती यांच्यात बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. आता ‘खतरों के खिलाडी ९’ शो फार रोमांचक वळणावर आला आहे. या सीजनचा विजेता कोणता स्पर्धक होणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. काही दिवसांपूर्वी या नवव्या सीजनचा विजेता म्हणून पुनीतचं नाव लीक झालं होतं. पण नंतर ही अफवा असल्याचं समोर आलं.

First published: February 27, 2019, 9:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading