पहिल्या Anniversary आधीच बाबा झाला कपिल शर्मा, घरी आली गोंडस परी

पहिल्या Anniversary आधीच बाबा झाला कपिल शर्मा, घरी आली गोंडस परी

कपिल शर्माने काही तासांपूर्वी आपल्या ट्विटरवर हा आनंद व्यक्त करत ही गूडन्यूज सगळ्यांना सांगितली.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : सगळ्यांना पोट धरून हसायला लावणाऱ्या प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) घरी आनंदाचा जल्लोष आहे. कारण कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिनी चतरथ (Gini Chatrath) यांनी एका गोड परी जन्म दिला आहे. कपिल शर्मा बाबा झाला आहे. कपिल आणि गिनी एका गोड परीचे पालक झालेत. कपिल शर्माने काही तासांपूर्वी आपल्या ट्विटरवर हा आनंद व्यक्त करत ही गूडन्यूज सगळ्यांना सांगितली.

कपिलने ट्वीट करून लिहिले आहे की, ' मुलगी झाल्याचा मला आनंद वाटतो. मला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद हवे आहेत. तुम्हा सर्वांना प्रेम. जय माता दी'

कपिलने हे ट्विट करताच त्याच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. कपिलच्या या ट्वीटबद्दल रकुल प्रीत, सायना नेहवाल, गुरू रंधावा, अरुणाचल प्रदेशचे सीएम पेमा खांडू अशा अनेक लोकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कपिल आणि गिनी चतरथ यांचं गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी अमृतसरमध्ये लग्न झाले होते. कपिलने दोन वर्षांपूर्वी ट्विटरवर गिनी आणि त्यांच्यातील नात्याचा खुलासा केला होता. लग्नानंतर काही दिवसांनी कपिलने पुन्हा एकदा आपला कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो' पुन्हा सुरू केला.

कपिलच्या लग्नात बॉलिवूड आणि टीव्ही जगातील अनेक कलाकार पोहोचले होते. कपिल आणि गिनी कॉलेजच्या काळापासून एकमेकांना ओळखतात. सुरुवातीला त्यांचे दोन्ही कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हते परंतु नंतर त्यांनी ते मान्य केले. 2017 मध्ये, जेव्हा कपिल वाईट परिस्थितीतून जात होता तेव्हा गिनीने त्याला खूप आधार दिला.

ही माहिती कपिलने एका मुलाखतीतही दिली होती. कपिलने म्हटले होते की, माझ्या कठीण काळात गिनीने मला साथ दिल्यामुळे ती माझ्यासाठी योग्य जोडीदार असल्याची जाणीव मला झाली. जुलैमध्ये कपिलने गिनी गर्भवती असल्याचे सांगितले होते. गिनीची काळजी घेण्यासाठी कपिलने काही काळ टीव्हीवरून ब्रेकही घेतला होता.

First published: December 10, 2019, 9:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading