#MeToo च्या आरोपानंतर अन्नू मलिकचा धक्कादायक निर्णय, इंडियन आयडलमधून बाहेर

#MeToo च्या आरोपानंतर अन्नू मलिकचा धक्कादायक निर्णय, इंडियन आयडलमधून बाहेर

अन्नू मलिक आता 'इंडियन आयडल 11 या' गायन रियलिटी शोमधून बाहेर पडला आहे. सोशल मीडियावर गोंधळ उडाल्यानंतर अन्नू मलिक याने एक खुला पत्र लिहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : गायक आणि संगीतकार अन्नू मलिक याच्यावर #MeToo चळवळीअंतर्गत अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. ज्यानंतर अन्नू मलिक आता 'इंडियन आयडल 11 या' गायन रियलिटी शोमधून बाहेर पडला आहे. सोशल मीडियावर गोंधळ उडाल्यानंतर अन्नू मलिक याने एक खुला पत्र लिहिलं आहे. हा वाद थांबला नसल्यामुळे अन्नू मलिकने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अन्नू मलिक आता 'इंडियन आयडल 11' च्या बाहेर आहे. त्याच्या जागी दुसऱ्या संगीतकाराला जागा घेण्यात आली असली तरी कोणाला जागा दिली याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. अन्नू मलिक याच्यावरील आरोपानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने सोनी टीव्हीला नोटीस पाठवली होती. आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही नोटीसही शेअर केली आहे.

इंडियन आयडल कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय हा स्वत: अन्नू मलिककडून घेण्यात आला आहे. जोपर्यंत मी निर्दोष असल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत कार्यक्रमात परत न येण्याचा निर्णय अन्नू मलिक याने घेतला आहे. ईटाइम्सशी बोलताना अन्नू मलिक म्हणाला की, मी हा निर्णय स्वेच्छेने घेतला आहे. मला शोमधून तीन आठवड्यांचा ब्रेक घ्यायचा आहे आणि माझं नाव साफ केल्यावरच मी परत येईन.

इतर बातम्या - मरताना वहिनीने दिला धक्का, माझ्या मुलीचा खरा बाप तूच हे भावाला सांग!

खरंतर वर्षभरापूर्वी #MeTooने बॉलिवूडमध्ये वादळ निर्माण झालं होतं. अनेक महिला कलाकारांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केल्याने खळबळ उडाली होती. यात अनेक प्रतिष्ठीत अभिनेत्यांवर आरोप झाले होते. त्यामुळे अनेकांना आरोपांचा सामना करावा लागला. सर्वात आधी अमेरिकेत #MeToo ची चळवळ सुरू झाली होती. त्या चळवणीने हॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती.

बॉलिवूडचा आघाडीचा गायक अन्नू मलिक (Anu Malik) याच्यावरही आरोप झाले होते. या वादळात गायिका नेहा भसीनने (Neha Bhasin) अन्नू मलिकवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला होता. या आधी सोना महापात्रा (sona Mohapatra) आणि श्‍वेता पंडित यांनी अन्नू मलिकवर Me Too चळवळीत आरोप केले होते.

इतर बातम्या - देवा! खात्यातून काढत होता कोणा दुसऱ्याचे पैसे, म्हणाला- मला वाटलं मोदींनी टाकले

महापात्रा यांनी एक ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली होती की महालांच्या सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी काय 'निर्भया'सारखीच घटना घडायला पाहिजे का? त्या ट्विटला उत्तर देताना नेहाने तिच्यावर आलेला प्रसंग सांगितला. पण यावर अन्नू मलिकची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

नेहाने सांगितलं की ती 21 वर्षांची असताना एका गाण्याची सीडी देण्यासाठी अन्नू मलिकला भेटली होती. त्यावेळी ती नवखी होती तर अन्नू प्रसिद्धीच्या शिखरावर होता. त्यांना भेटायला गेले असताना तो सोफ्यावर झोपलेला होता आणि माझ्या डोळ्यांविषयी चर्चा करत होता. त्याचं सर्वच वागणं अत्यंत आक्षेपार्ह होतं. मला ते मुळीच पटलं नाही. त्यामुळे खोटं कारण सांगून मी तिथून पळून गेले.

माझ्या आईने बोलावल्याचं कारण सांगून मी तिथून पळाले. मात्र नंतरही अन्नू  मलिकने माझा पिच्छा सोडला नाही. तो नंतरही SMS करतच राहिला मात्र मी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाही असंही तिने म्हटलं होतं.

इतर बातम्या - 'रड्या ऑफ द ईयर अवार्ड संज्यालाच दिला पाहिजे'

Published by: Renuka Dhaybar
First published: November 21, 2019, 8:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading