घटस्फोटानंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री एकटी सांभाळतेय मुलीला

त्याचं माझ्यावरचं प्रेम पाहून मीही लग्नाला तयार झाले. मला वाटलं होतं की मीही त्याच्यावर प्रेम करायला लागेन.

  • Share this:

जुही परमार हे नाव तसं हिंदी टीव्ही जगताला नवं नाही. कुमकुम या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या जुहीचा अभिनेता सचिन श्रॉफशी घटस्फोट झाला असून ती सिंगल मदर आहे. जुही अनेकदा तिच्या मुलीसोबतच्या ट्रीपचे फोटो शेअर करत असते. जुहीला सहा वर्षांची समायरा ही मुलगी आहे. सध्या जुहीच तिच्या मुलीचा सांभाळ करत आहे.

पुलमध्ये मुलीसोबत खेळतानाचे जुहीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मदर्स डेचं औचित्य साधून जुहीने मुलीसोबतचा हा खास फोटो शेअर केला.

गेल्यावर्षी सचिन आणि जुही यांनी त्यांचा आठ वर्षांचा संसार मोडत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या या बातम्यांमुळे जुही अचानक चर्चेत आली होती. न्यायालयाने मुलीची कस्टडी जुहीकडे दिली.

एका मुलाखतीत जुहीने घटस्फोटाबद्दल आपलं मत देताना म्हटलं होतं की, ‘मी सचिनला लग्नापूर्वीपासून ओळखत होती. पण लग्नापूर्वी पूर्ण ओळखण्यासाठीचा जो वेळ हवा असतो तो आम्ही एकमेकांना दिला नाही. त्याने मला लग्नासाठी विचारलं आणि आम्ही लगेच लग्न केलं.’

‘त्याचं माझ्यावरचं प्रेम पाहून मीही लग्नाला तयार झाले. मला वाटलं होतं की मीही त्याच्यावर प्रेम करायला लागेन. मला नाही वाटत मी त्या लग्नाला लव्ह मॅरेज म्हणू शकेन.’

जुही पुढे म्हणाली की, ‘लग्नाच्या काही वर्षांनंतर आमच्या नात्यात चढ- उतार यायला लागले. मी नात्याला मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते. पण शेवटी वेगळं होणं हाच दोघांसाठी चांगला निर्णय होता हे माझ्या लक्षात आलं.’

जुहीला अखेरचे तंत्र मालिकेत पाहिले होते. या शोमध्ये तिच्यासोबत मनीष गोयलही होता. नुकतीच ही मालिका बंद झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2019 09:09 AM IST

ताज्या बातम्या