टीव्ही अभिनेत्याला पोलिसांची ‘थर्ड डिग्री’, मॉलमधून थेट रुग्णालयात

टीव्ही अभिनेता अंश अरोराने गाझियाबाद पोलिसांवर त्याला मारपीट केल्याचा आणि धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे.

  • Share this:

टीव्ही अभिनेता अंश अरोराने गाझियाबाद पोलिसांवर त्याला मारपीट केल्याचा आणि धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडित अभिनेत्याच्या आरोपांनुसार ११ मे रोजी तो रात्री गाझियाबाद येथील इंदिरापुरम भागातील एका मॉलमधील २४x७ दुकानात खरेदीसाठी गेला होता. यावेळी त्याची दुकानाचा मालक आणि कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची झाली.

यानंतर दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी तो पुन्हा त्या मॉलमधील दुकानात गेला. यावेळी तिथे पोलिसही आले होते. यानंतर गाझियाबाद पोलिसांनी अंश याला बेदम मारले. अंशच्या मते, पोलिसांनी त्याला थर्ड डिग्रीही दिली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अंशच्या आई- वडिलांनी गाझियाबादच्या एसएसपीकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.

या प्रकरणात गाझियाबाद पोलिसांनी त्यांची बाजू मांडली आहे. अभिनेता अंश अरोराने १२ मे रोजी रात्री २४x७ दुकानात जाऊन मारपीट करत तोडफोडही केली.

ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद आहे. यानंतर दुकानातील कर्मचाऱ्यांनी १०० नंबरला फोन केला. यानंतर अंशला अटक करण्यात आली. यावेळी त्याची वैद्यकीय चाचणी केली आणि त्याला जामीन देण्यात आला.

पोलिसांवर करण्यात आलेल्या आरोपांची सध्या चौकशी करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. अंशनेच मारपीटला सुरुवात केली असल्याचं पोलिसांचं म्हणणं असून अंशवरच्या आरोपांचीही चौकशी करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2019 01:16 PM IST

ताज्या बातम्या