बाप की हैवान? कोरोनाच्या भीतीनं या खेळाडूनं केली आपल्या 5 वर्षांच्या लेकाची हत्या

बाप की हैवान? कोरोनाच्या भीतीनं या खेळाडूनं केली आपल्या 5 वर्षांच्या लेकाची हत्या

खेळाडूनं रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या त्याच्या 5 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचे कबुल केले आहे. 32 खेळाडूनं त्यानंतर स्वत: ला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

  • Share this:

अंकारा, 15 मे : जगभरात कोरोनानं थैमान घातला आहे. एका विषाणूनं लाखो लोकांचा जीव घेतला आहे. या सगळ्यात तुर्कीच्या अधिका्यांनी एका माजी फुटबॉल खेळाडूला अटक केली आहे. या खेळाडूनं रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या त्याच्या 5 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचे कबुल केले आहे. 32 वर्षीय सेव्हर टोकतास यांनी स्वत: ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. 4 मे रोजी सेव्हरनं त्याचा मुलगा कासिमचे तोंड उशीनं दाबून त्याची हत्या केली, अशी माहिती अनाडालु एजन्सीने दिली.

सुरुवातीला मुलाचा मृत्यू संशयास्पद मानला जात होता, त्यामुळं त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू गुदमरून झाल्याचं समोर आलं. हबरटर्क टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार, सेव्हर आपल्या मुलावर प्रेम करत नसल्यामुळं त्यानं त्याचे तोंड उशीनं दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर 11 दिवसांनी सेव्हरनं स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. सेव्हर टीम बर्सा येल्डिरीमस्पोरकडून फुटबॉल खेळत होता.

वाचा-वाटेतच बाप गमावला, मुंबईतून कोकणात निघालेल्या मुलांच्या डोळ्यासमोरच छत्र हरपलं!

सेव्हरचा मुलगा कासिमला सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्यामुळं 23 एप्रिलला रुग्णालयात दाख करण्यात आले होते. त्याला सेव्हरसोबत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचवेळी सेव्हरनं आपल्या मुलाची हत्या केली. भानावर आल्यानंतर त्यानं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. कासिमला लगेचच अतिदक्षता विभागात नेण्यात आलें, तिथंच दोन तासांनंतर त्याचा मृत्यू झाला.

वाचा-सलग दुसऱ्या दिवशी दोन मोठे अपघात, 3 मजुरांचा जागीच मृत्यू 44 जखमी

सेव्हर टोकतासला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. अद्याप त्याच्या सुनावणीची तारीख देण्यात आलेली नाही आहे. सेव्हरनं 2007 आणि 2009मध्ये तुर्कीकजून तुर्कीश सुपर लीगमध्ये भाग घेतला होता.

वाचा-अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा राय याचं निधन, बॅंक ऑफिसर ते गॅंगस्टर असा होता प्रवास

First published: May 15, 2020, 10:46 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading