अमेरिकेत ट्रम्प सरकारवर शट्डाऊनची नामुष्की ओढवली !

अमेरिकेत ट्रम्प सरकारवर शट्डाऊनची नामुष्की ओढवली !

अमेरिकेन सरकार बंद व्हायची वेळ आलीये. तिथे त्याला शट्डाऊन असं म्हणतात. सरकारी खर्चासाठीचं विधेयक मंजूर न झाल्यानं ट्रम्प सरकारवर ही नामुष्की आलीये. अमेरिकन सरकारची अनेक कार्यालयं आता बंद राहतील. काही वस्तू संग्रहालयं बंद होतील, मोठमोठ्या उद्यानांचे गेट बंद होतील.

  • Share this:

20 जानेवारी, वाशिग्टन : अमेरिकेन सरकार बंद व्हायची वेळ आलीये. तिथे त्याला शट्डाऊन असं म्हणतात. सरकारी खर्चासाठीचं विधेयक मंजूर न झाल्यानं ट्रम्प सरकारवर ही नामुष्की आलीये. अमेरिकन सरकारची अनेक कार्यालयं आता बंद राहतील. काही वस्तू संग्रहालयं बंद होतील, मोठमोठ्या उद्यानांचे गेट बंद होतील. हे कोणत्या संपामुळे होत नाहीये. सरकारकडे या सेवा चालवण्यासाठी निधी नाहीये. म्हणजे, तो निधी मंजूर होऊ शकलेला नाहीये. दरवर्षी अमेरिकन सरकारला आपला खर्च मजूर करून घ्याला लागतो. ते काँग्रेस आणि सिनेट, दोन्हीमध्ये पास व्हावं लागतं. ते तसं झालं नाही. सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रॅट्समधल्या खडाजंगीमुळे, डेमोक्रॅट्स पक्षानं विधेयक रोखून धरलं, आणि एका मतानं ट्रम्प सरकारचा पराभव झाला.

या शट्डाऊनमुळे संरक्षण मंत्रालयाची काही कार्यालयं, लष्करी प्रशिक्षण केंद्रं, गुप्तचर खात्याची काही कामं बंद पडणार आहेत. तसंच, राष्ट्रीय उद्यानं, स्मारकं, वस्तू संग्रहालयं, व्हिसा आणि पासपोर्ट प्रक्रिया केंद्रांवर परिणाम होणार आहे.  काही सेवांवर मात्र परिणाम होणार नाही.  राष्ट्रीय सुरक्षा, पोस्टाची सेवा, एअर ट्रॅफिक कंट्रोल, आपात्कालीन वैद्यकीय सेवा, आपत्ती सहाय्य, कारागृह, कर यंत्रणा आणि वीज निर्मितीवर कोणताही परिणाम होणार नाही.

व्हाईट हाऊस आणि काँग्रेसमध्ये एकच पक्ष असतानाही शट्डाऊन व्हायची ही पहिलीच वेळ आहे. २०१३ साली ओबामा सत्तेत असतानाही असाच शट्डाऊन झाला होता. पण तेव्हा काँग्रेसमध्ये डेमोक्रॅट पक्षाला बहुमत नव्हतं. डेमोक्रॅट पक्षानं याला ट्रम्प शट्डाऊन असं नाव दिलंय. तर ट्रम्प यांनी कायदा पाळणाऱ्या नागरिकांना वेठीस धरण्याचा आरोप विरोधकांवर केलाय. या खडाजंगीचं मूळ कारण आहे एक विधेयक जे ट्रम्पोजी आणू पाहतायेत. तरुण स्थलांतरितांना परत पाठवण्याबाबत हे विधेयक आहे. हे तरुण तान्हे किंवा खूप छोटे असताना त्यांच्या पालकांसोबत आले होते. त्यांची संख्या आहे ७ लाख. पण त्यांना परत पाठवण्यास डेमोक्रॅट पक्षाचा विरोध आहे. पण ट्रम्पही अडून बसलेत. त्यामुळे काहीच तोडगा निघत नाहीये. तरी वाटाघाटी सुरू आहेत. सतत अपयशाचा सामना करणाऱ्या ट्रम्प प्रशासनाला मात्र आणखी एक चपराक बसलीये, एवढं मात्र नक्की.

First published: January 20, 2018, 2:17 PM IST

ताज्या बातम्या