News18 Lokmat

तुकाराम मुंढे यांची 'या' ठिकाणी झाली नियुक्ती!

आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळं तुकाराम मुंढे फार काळ कुठेच टिकले नाहीत. 2005 च्या बॅचचे चे IAS अधिकारी आहेत. प्रोबेशननंतर 2006 मध्ये त्यांनी सोलापूरचे आयुक्त म्हणून कामाला सुरूवात केली. गेल्या 12 वर्षात त्यांच्या तब्बल 11 वेळा बदल्या झाल्यात.

News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2018 01:36 PM IST

तुकाराम मुंढे यांची 'या' ठिकाणी झाली नियुक्ती!


नाशिक, 22 नोव्हेंबर : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. नाशिकमधून तुकाराम मुंढेंची बदली झाल्यानंतर आता ते थेट मुंबईत काम करणार आहे.तुकाराम मुंढे यांची बदली करण्याचा निर्णयाबद्दल अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पत्रक काढले आहे. तुकाराम मुंढे यांची नियुक्ती आता नियोजन विभागात करण्यात आली आहे. नियोजन विभागात तुकाराम मुंढे आता सहसचिव म्हणून काम करणार आहे. सह सचिव हे पद रिक्त होते. त्यापदावर मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे तुकाराम मुंढे आता यापुढे कोणत्याही पालिकेचे आयुक्त म्हणून तुर्तास तरी काम करणार नाही. थेट मंत्रालयातच नियुक्ती झाल्यामुळे बदलीचे चक्रही थांबले आहे.

Loading...आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळं तुकाराम मुंढे फार काळ कुठेच टिकले नाहीत. 2005 च्या बॅचचे चे IAS अधिकारी आहेत. प्रोबेशननंतर 2006 मध्ये त्यांनी सोलापूरचे आयुक्त म्हणून कामाला सुरूवात केली. गेल्या 12 वर्षात त्यांच्या तब्बल 11 वेळा बदल्या झाल्यात.धडाकेबाज काम, हट्टी स्वभाव आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याची वृत्ती यामुळं त्यांचा लोकप्रतिनिधींशी कायम संघर्ष होत आलाय. वर्ष-दीड वर्षांपेक्षा जास्त काळ ते कुठेच टिकले नाहीत. मात्र या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. ते जिथे जातील तिथे कर्मचाऱ्यांना शिस्त लावतात. गैरव्यवहार मोडून काढतात.लोकप्रतिनिधींची मनमानी बंद करतात त्यामुळं त्यांची वारंवार भांडणं होतात. त्यांच्याविरूद्ध आंदोलनं होतात. नाशिकमध्ये नगरसेवकांविरूद्धच्या वादात एकदा मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती केली मात्र काही महिने वगळता शांतता फार काळ राहिली नाही. आपल्या स्वभावाला मुरड घाला असं त्यांना अनेकदा सांगण्यात आलं मात्र मुंढेंनी कधीच आपला स्वभाव बदलला नाही.


नेहमी साधनशुचीतेच्या गप्पा करणाऱ्या भाजपलाही मुंढे मानवले नाहीत. हरियाणात काँग्रेसचं सरकार असताना तिथले एक अधिकारी अशोक खेमका यांच्याही अशा प्रकारे बदल्या होत होत्या तेव्हा भाजपने रान उठवलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात जेव्हा मुंढे यांची बदली होत असे तेव्हा भाजपने सरकारवर टीका केली होती.स्वच्छ अधिकाऱ्यांना संरक्षण दिलं जातं हे जनतेला सांगण्याची संधी भाजपला होती. तुकाराम मुंढे यांच्या प्रकरणानंतर आता कुठल्याच सरकारला प्रामाणिक अधिकारी नको असतात हेच सिद्ध झालं अशी प्रतिक्रीया व्यक्त होतेय.


आपल्या चांगल्या कामासाठी मुंढे यांना अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारही मिळालाय. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचं दडपण आल्याने त्या त्या वेळी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या बदलीचे निर्णय घ्यावे लागले.कारकिर्द2006-07 महापालिका आयुक्त, सोलापूर


2007 प्रकल्प अधिकारी, धारणी


2008 उपजिल्हाधिकारी, नांदेड


2008 सीईओ, नागपूर जिल्हा परिषद


2009 अति. आदिवासी आयुक्त, नाशिक


2010 के. व्ही. आय. सी. मुंबई


2011 जिल्हाधिकारी, जालना


2011-12 जिल्हाधिकारी, सोलापूर


2012 विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई


2016 आयुक्त, नवी मुंबई महापालिका


2017 पिंपरी-चिंचवड परिवहन, पुणे


2018 नाशिक महापालिका आयुक्त


==============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...