इंडोनेशियामध्ये त्सुनामीचा हाहाकार, मृतांचा आकडा 43वर तर 600पेक्षा जास्त लोक जखमी

इंडोनेशियामध्ये आलेल्या त्सुनामीमुळे तब्बल 43 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 600 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 23, 2018 07:57 AM IST

इंडोनेशियामध्ये त्सुनामीचा हाहाकार, मृतांचा आकडा 43वर तर 600पेक्षा जास्त लोक जखमी

इंडोनेशिया, 23 डिसेंबर : इंडोनेशियामध्ये आलेल्या त्सुनामीमुळे तब्बल 43 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 600 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितल्यानुसार, ज्वालामुखीच्या फुटल्यामुळे ही त्सुनामी आली, ज्यामुळे सध्या इंडोनेशियामधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.Loading...


जावाच्या दक्षिण दिशेने आणि दक्षिणी सुमात्रा किनाऱ्यावर त्सुनामीच्या लाटांमुळे हजारो इमारती कोसळल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती एजन्सीचे प्रवक्ते सुतोपो पुर्वो नुग्रोहो यांनी सांगितल्यानुसार, शनिवारी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास त्सुनामीने रौद्र रुप धारण केलं आणि त्यात तब्बल 43 लोकांचा जीवा गेला आहे तर 600पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. यात 2 जण बेपत्ता असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.


ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तो फुटल्यामुळे ही त्सुनामी आली आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. सध्या इंडोनेशियमामध्ये पोलिसांकडून आणि बचावपक्षाकडून बचावकार्य सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2018 07:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...