S M L

इंडोनेशियामध्ये त्सुनामीने घेतला 281 जणांचा जीव, जखमींचा आकडा 1000वर

इंडोनेशियामध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये आता मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. सध्या मृतांचा आकडा 281 वर गेला आहे तर 1000हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2018 09:28 AM IST

इंडोनेशियामध्ये त्सुनामीने घेतला 281 जणांचा जीव, जखमींचा आकडा 1000वर

इंडोनेशिया, 23 डिसेंबर : इंडोनेशियामध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये आता मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. सध्या मृतांचा आकडा 281 वर गेला आहे तर 1000हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितल्यानुसार, ज्वालामुखीच्या फुटल्यामुळे ही त्सुनामी आली, ज्यामुळे सध्या इंडोनेशियामधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

जावाच्या दक्षिण दिशेने आणि दक्षिणी सुमात्रा किनाऱ्यावर त्सुनामीच्या लाटांमुळे हजारो इमारती कोसळल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती एजन्सीचे प्रवक्ते सुतोपो पुर्वो नुग्रोहो यांनी सांगितल्यानुसार, शनिवारी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास त्सुनामीने रौद्र रुप धारण केलं आणि त्यात तब्बल 281 लोकांचा जीवा गेला आहे तर 1000पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. यात काहीजण बेपत्ता असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, इंडोनेशियाच्या बांटेन इथल्या सेरांग समुद्रकिनाऱ्याला त्सुनामीचा फटका बसलाय. या त्सुनामीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एका बीचवर 'सेव्हंटीन' या रॉक बँडचा कार्यक्रम सुरू होता. त्यांचा परफॉम्सन्स सुरू असतानाच त्सुनामीच्या लाटांनी या रॉक बँडला गिळंकृत केलं. या बँडमधल्या दोन सदस्यांचा मृत्यू झाला असून चार जण बेपत्ता आहेत.


त्यानंतर या लाटांनी सुनामीचं स्वरूप धारण केल्याचं सांगितलं जातंय. समुद्रात 15 ते 20 फुट उंच लाटा उसळल्या होत्या असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. त्सुनामीचा सर्वाधिक फटका पेनदेंगलेग, सेरांग, आणि दक्षिण लाम्पुंग परिसराला बसलाय.


VIDEO : उदयनराजे असं काही बोलले ज्याने राष्ट्रवादीच्या चिंता वाढल्या

Loading... 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2018 09:28 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close