अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात तृप्ती देसाईंना जामीन नामंजूर;तृप्ती देसाई फरार

अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात तृप्ती देसाईंना जामीन नामंजूर;तृप्ती देसाई फरार

कोर्टात दिलेल्या माहितीनुसार तृप्ती देसाई यांनी आपल्या काही मित्रांसह मकसरे यांना बालेवाडी परिसरात गाठलं होतं

  • Share this:

29 एप्रिल:  भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.  विजय मकासरे यांनी तृप्ती देसाईच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटी अंतर्गत तक्रार दिली होती.

कोर्टात दिलेल्या माहितीनुसार तृप्ती देसाई यांनी आपल्या काही मित्रांसह   मकसरे यांना बालेवाडी परिसरात गाठलं होतं. त्यानंतर त्यांचा मोबाईल त्यांच्याकडून हिसकावून घेतला. त्यांना मारहाणही केली. तसंच तृप्ती देसाईंनी मकसरे यांना त्यांच्या जातीवरून अश्लील शिव्याही दिल्या. याबद्दल मकसरे यांनी दरोडा मारहाण आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा तृप्ती देसाईंविरूद्ध दाखल केला आहे. त्यात जामिनाचा अर्ज  देसाई यांनी पुणे कोर्टात आणि नंतर मुंबई हायकोर्टात केला. पण दोन्हीकडे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.  तृप्ती देसाई सध्या नॉट रीचेबल आहेत. गेल्या आठवडाभरापासून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

मंदिर प्रवेशाच्या आपल्या  स्टंटमुळे तृप्ती देसाई प्रसिद्ध झाल्या होत्या. कोल्हापूर,शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वरच्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी  आंदोलनं केली होती. आता याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणारआहे.

First published: April 29, 2018, 7:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading