ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ; किम कार्दशियनचा पती राष्ट्रपती निवडणुकीच्या रिंगणात

ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ; किम कार्दशियनचा पती राष्ट्रपती निवडणुकीच्या रिंगणात

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होणार आहे. यंदा ट्रम्प यांच्यासमोर आव्हानं वाढली आहेत

  • Share this:

मुंबई, 5 जुलै : सध्या जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. मात्र यादरम्यान अमेरिकेत मात्र येत्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीतही डोनाल्ड ट्रम्प निवडणूक लढवणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत उद्भवलेली परिस्थिती व यापूर्वीच्या अनेक कारणांमुळे जनता ट्रम्प यांच्याविषयी फार सकारात्मक असल्याचे दिसत नाही. यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची चिंता वाढली आहेत. अमेरिकन टीव्ही स्टार किम कार्दशियन वेस्टचे पती आणि अमेरिकन रेपर कान्ये वेस्ट यांनी शनिवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. तेसुद्धा या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेत आहेत.

कान्ये वेस्टने ट्विटरद्वारे युनायटेड स्टेटस प्राइमरी निवडणूक 2020 मध्ये लढण्याची घोषणा केली आहे. कान्ये वेस्ट राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविल्यास त्यांचा अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्याशी सामना होईल. कान्ये वेस्टच्या या घोषणेनंतर अमेरिकेत मोठा चर्चा सुरू झाली आहे.

कान्ये वेस्टने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे - 'आता आपल्याला देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि अमेरिकेच्या जनतेला दिलेलं वचन प्रत्यक्षात आणायचे आहे. आपल्याला एकत्र येऊन नवीन भविष्य तयार करावे लागेल. मी अमेरिकेत होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीसाठी लढणार आहे.

हे वाचा-जगाला शॉक देत 11 हजार फूटांवर पोहचले मोदी, पाहा सीमेवरचे PHOTOS

कान्ये यांच्या या ट्विटनंतर लोकांनी किम कार्दशियनला अमेरिकेची पहिली महिला म्हणून संबोधण्यास सुरुवात केली आहे. किम व्यतिरिक्त एलोन मस्क यांनीही या ट्विटवर कान्ये यांचे समर्थन केले आहे. कान्ये यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना इलोन मस्क यांनी लिहिले - 'कान्ये मी तुझे समर्थन करतो.'

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: July 5, 2020, 3:16 PM IST

ताज्या बातम्या