भरधाव ट्रकने बैलगाडीला उडवले, 4 जण जागीच ठार तर बैलांचेही झाले तुकडे!

भरधाव ट्रकने बैलगाडीला उडवले, 4 जण जागीच ठार तर बैलांचेही झाले तुकडे!

उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा - येडशी रोडवर हा अपघात झाला आहे. संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली.

  • Share this:

बालाजी निरफळ, प्रतिनिधी

उस्मानाबाद, 25 डिसेंबर : वर्षाचा अखेरचा बुधवार हा अपघात वार ठरला आहे. औरंगाबादमध्ये भीषण अपघातानंतर सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा - येडशी रोडवर हा अपघात झाला आहे. संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली.  वडगाव पाटीजवळ बैल गाडीला भरधाव ट्रकने उडवले. हा अपघात इतका भीषण होता की, यात बैलगाडीचा चक्काचूर झाला. यात 4 जण जागीच ठार झाले आहे तर 2 जण गंभीर जखमी आहे. तसंच या अपघातात दोन्ही बैलांचा जागीत मृ्त्यू झाला.  सर्व जण वडगावचे रहिवासी होते.

मयतामध्ये युवराज शेटे (वय7) मुलगी गुंजन माळवदे (वय 13) सौ फनुबाई पवार (वय 50) आणि रेश्मा माळवदे (वय 40) यांचा मृत्यू झाला आहे. तर

दत्तात्र्ये शेटे (वय 35) हे जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी उस्मानाबादयेथील पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

तेराव्याला गेलेलं संपूर्ण कुटुंबच संपलं, अपघातामध्ये 5 जण जागीच ठार

दरम्यान, आज सकाळी औरंगाबादमध्ये आणखी अपघाताची घटना घडली.  नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिक्षाचा आणि कारचा समोरा-समोर भीषण अपघात होऊन रिक्षामधील सर्व 5 जण  जागीच ठार झाले तर मृतांमध्ये 6 महिन्यांचा आणि 9 वर्षाच्या अशा दोन चिमुकल्यांसह दोन महिलांचा समावेश आहे. हा अपघात औरंगाबाद जालना महामार्गावरील शेकटा गावाजवळ घडला.

आज सकाळी औरंगाबादकडून जालणाच्या दिशेने निघालेली सुसाट वेगातील कार औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेकटा गावाजवळ येताच रिक्षाला समोरासमोर धडकली. या अपघातात रिक्षामधील जाधव परिवारातील पाच जण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांची समोरील बाजचा अक्षरशः चुराडा झाला आहे. एकाच घरातील 5 जणांनी अशा प्रकारे प्राण गमावल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हा भीषण अपघात पाहून परिसरातील व्यापारी नागरिकांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी धाव घेत दोन्ही कारमधील मृतांना बाहेर काढत रुग्णवाहिका आणि पोलीस वाहनातून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवलं. वाहनांमध्ये आणि रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. मृत हे जालना जिल्ह्यातील रहिवाशी आहे. एकाच परिवारातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

First Published: Dec 25, 2019 10:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading