वर्धा, 19 मे : हिंगणघाटजवळील इंझाळा मार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. अवैधरिच्या वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकने एका ट्रॅव्हल्सचा जोरात धडक दिली आहे. या धडकेमध्ये एका 9 वर्षीच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तब्बल 24 प्रवासी जखमी झाले आहेत.
हिंगणघाट जवळील इंझाळा मार्गावर हा अपघात झाला आहे. वाळूने भरलेल्या ट्रकची ट्रॅव्हल्सला भीषण धडक झाली. या अपघातामध्ये धडक लागल्यानंतर वाळूचा ट्रक खाली कोसळला आहे. त्यामुळे सगळी वाळू रस्त्यावर पसरली आहे. या भीषण अपघातामध्ये 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून यात 24 प्रवासी जखमी झाले आहे.
हेही वाचा : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीने केलं मुंबईच्या उद्योगपतीचं अपहरण
अमरावती जिल्ह्याच्या धोतरखेडा इथून ट्रॅव्हल्सने जात होते. ताडोबा येथे जंगल सफारीला जात असताना हा अपघात झाला आहे. अपघात घडताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना तात्काळ सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींवर सध्या उपचार सुरू असून पोलिसांनी घटनास्थळावरून मृत चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील वाळू घाटांवर उच्च न्यायालयाकडून स्थगिती आहे. पण असं असतानाही अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. त्यामुळे पोलिसांसह महसूल विभागाचं या सगळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करण्यात येत आहे.
48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, आतापर्यंतच्या टाॅप 18 बातम्या, पाहा VIDEO