ट्रकच्या भीषण धडकेनंतर ST बसने घेतला पेट, 23 प्रवासी जखमी

बसमधील सुमारे 23 प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी बस चालक आणि वाहक या अपघातात गंभीर जखमी झाले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 08:34 AM IST

ट्रकच्या भीषण धडकेनंतर ST बसने घेतला पेट, 23 प्रवासी जखमी

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 09 जुलै : औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहसमोर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर एसटीबसने पेट घेतल्यामुळे यात 23 प्रवासी जखमी झाली असून 7 जण गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. रात्री दिड ते दोनच्या सुमारास अपघात झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं.

बसमधील सुमारे 23 प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी बस चालक आणि वाहक या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. या दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर बसने जागेवर पेट घेतला. आगीत बस पूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एसटी महामंडळाच्या नगर विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

बस औरंगाबादवरून पुण्याला जाणार होती. त्याच वेळी नगरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने बसला समोरून धडक दिली. ट्रकची धडक एवढी जोरात होती की परिसरात मोठा आवाज झाला. बसमधील प्रवासी अपघाताच्या वेळी झोपेत होते. त्यामुळे नेमकं काय झालं हे प्रवाशांना समजलं नाही आणि एकच ओरडा झाला. बस चालकाच्या शेजारील भागात असलेले प्रवासी सर्वाधिक जखमी झाले आहेत. यात एका लहान बाळाचादेखील समावेश आहे.

बसमधील जखमींना नगरमधील कळमकर हॉस्पिटल, साई एशियन आणि अपेक्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. जखमींपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. यात एसटी चालक आणि वाहकांचादेखील समावेश आहे. जखमींमध्ये औरंगाबाद सिल्लोड नगर आणि पुण्यातील प्रवाशांचा समावेश आहे.

Loading...

येत्या 24 तासांत मुंबईत अतिवृष्टी, राज्यात 'अशी' आहे पावसाची स्थिती

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमींना तात्काळ नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर त्यांच्या कुटुंबातील लोकांना या अपघाताची माहिती देण्याचं काम पोलीस करत आहे. दरम्यान, या अपघाताची चौकशीही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

थरारक CCTV VIDEO : धावत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न प्रवशाच्या जीवावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 08:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...