गावतल्या तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर गावकरी भडकले, भर रस्त्यात ट्रक दिला पेटवून

अपघात झाल्यानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे.

  • Share this:

अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातली ही घटना आहे. संगमनेर तालुक्यात मांडवे बुद्रुक इथं आज सकाळच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

या धडकेमध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. 25 वर्षीय शरद डोलनर असं मृत झालेल्या युवकाचं नाव आहे. या अपघातात शरदसोबत असला एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

अपघात घडताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली. संतप्त जमावाने रागात थेट ट्रक पेटवून दिला.

पेटवलेला ट्रक आगीत पूर्णपणे भस्मसात झाला आहे. याबद्दल संगमनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नागरिकांना शांत होण्याचं आवाहन केलं.

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतं. तर पोलिसाांनी आता या प्रकरणात अधिक तपास सुरू केला आहे.

दरम्यान, शरदच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तर त्याच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2019 05:28 PM IST

ताज्या बातम्या