बाईकवर जाणाऱ्या 2 मित्रांना सुसाट वेगात येणाऱ्या टँकरने चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू

बाईकवर जाणाऱ्या 2 मित्रांना सुसाट वेगात येणाऱ्या टँकरने चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू

औरंगाबाद शहराकडे येत असताना औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील के.डी. आर.फार्मजवळ औरंगाबादच्या दिशेने सुसाट वेगात येणाऱ्या टँकरने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.

  • Share this:

औरंगाबाद, 11 डिसेंबर : रस्त्यातील खड्ड्यातून मार्ग काढत औरंगाबादला येणाऱ्या दोन तरुणाच्या दुचाकीला सुसाट वेगात असलेल्या टँकरने चिरडलं. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास औरंगाबाद नाशिक महामार्गावर घडली.

सुरेश लक्ष्मण उबाळे, अर्जुन तुळशीराम माळी अशी अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांची नावं आहेत. दोन्ही तरुण गंगापूर तालुक्यातील शहापूरबंजार गावातील रहिवाशी होते. दोन्ही तरुण रात्री शेतातील टोमॅटोचे ट्रक भरून औरंगाबाद शहराकडे येत असताना औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील के.डी. आर.फार्मजवळ औरंगाबादच्या दिशेने सुसाट वेगात येणाऱ्या टँकरने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात चिरडले गेल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

इतर बातम्या - पाचव्या मजल्यावरून स्कूटीवर पडली 8 महिन्याची चिमुरडी, असा वाचला जीव!

अपघातानंतर टँकर चालकाने घटनस्थळावरून पळ काढला. नाशिक महामार्गावर ठीक-ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडलेले आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता बनविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष दिले जात नाही. यामुळे या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात नित्याचीच बाब झाली आहे. जर लवकर या रस्त्याची दुरुस्ती केली गेली नाही तर येत्या काळात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतर बातम्या - VIDEO: रोडसाईड रोमिओची महिला शिपायाकडून धुलाई, 27 सेकंदात 23 वेळा बुटाने हाणलं!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारची ट्रकला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर 2 गंभीर

महामार्गावर वारंवार वाहनांचे अपघात होत असतात. मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या कारची पूढे जाणार्‍या ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले.

पहाटे तीन वाजताच्या सुमारास ओझर्डै गावाजवळ हा अपघात झाला. महेश कदम अशी मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे तर संतोष भोसले आणि प्रवीण कोकाटे अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. अपघात घडताच स्थानिकांकडून तात्काळ जखमींना नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

BREAKING: नाराज आहात का? असा प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडेंचं सूचक विधान, म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 03:20 PM IST

ताज्या बातम्या