मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 5 ठार तर 35 जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 5 ठार तर 35 जखमी

अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मिळेल त्या वाहनाने जखमींना रुग्णलयात नेलं.

  • Share this:

मनमाड, 24 फेब्रुवारी : मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव आणि वडाळीभोई दरम्यान दोन आयशरची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण ठार तर 35 जण जखमी झालेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी चांदवड, पिंपळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर आहे. नाशिकच्या टाकळी येथून चांदवड तालुक्यातील केंद्राई देवस्थ येथे जावळाच्या कार्यक्रमासाठी हे सर्व जण जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघात इतका भीषण आहे की दोन्ही वाहन चक्काचूर झाली आहेत.

अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मिळेल त्या वाहनाने जखमींना रुग्णलयात नेलं. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातासंदर्भात माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार हे संपूर्ण कुटुंब एका जावळाच्या कार्यक्रमासाठी चालले होते. तेव्हा त्यांच्या गाडीला अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले असून ते नजिकच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणात अधिक तपास करत आहे. अपघात नेमका कसा झाला आणि त्यात कोणाची चूक होती यासंद्रभात अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत. तर अधिक माहितीसाठी परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार आहेत.

पण दरम्यान, या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


LIVE VIDEO : लग्न सोहळ्यात बंदुकीने पैसे उडवण्याचा प्रयत्न, गोळी लागून डान्सरचा मृत्यू


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2019 03:52 PM IST

ताज्या बातम्या