भारतात लवकरच लाँच होणार 'ही' 12 लाखांची बाईक; काय आहेत एवढी फीचर्स?

भारतात लवकरच लाँच होणार 'ही' 12 लाखांची बाईक; काय आहेत एवढी फीचर्स?

याच महिन्यात लाँच होणार ही बाइक

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : Triumph Motorcycles ही कंपनी 23 मे रोजी भारतात आपली Scrambler 1200 ही बाइक लाँच करणार आहे. कंपनीने याआधी जागतीक बाजारपेठेत Scrambler 1200 XC आणि Scrambler 1200 XE हे दोन व्हेरिएंट लाँच केले. त्यापैकी Scrambler 1200 XC हे एकच मॉडेल कंपनी भारतात लाँच करणार आहे. भारतात या बाइकची किंमत 10 ते 12 लाख रुपये राहू शकते.


इंजिन - Triumph Scrambler 1200 XC मध्ये 1200 सीसीचे दोन इंजिन देण्यात आले आहेत. हे इंजिन 7,400 rpm वर 89 bhp ची पावर आणि 3,950 rpm वर 110 Nm चा पीक टॉर्क जनरेट करतं. या बाइकला 21-इंचाचं फ्रंट आणि 17-इंचाचं रियर व्हील लावण्यात आलं आहे. या गाडीमध्ये कल्च असिस्टसह 6-स्पीड गियरबॉक्स ट्रांसमिशन देण्यात आले आहेत.


Ford Aspireचं ब्लू व्हर्जन लाँच; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत


स्पेसिफिकेशन – या बाइकला रेट्रो लुक देण्यात आला आहे. तसंच LED डेटाइम रनिंग लॅम्पसह LED हेडलॅम्प देण्यात आला आहे. फीचर्स सांगायचे झाले तर, या बाइकला लेटेस्ट जनरेशन फुल कलर TFT Instrument डिस्प्ले देण्य़ात आला आहे. तसंच यात गोप्रो कंट्रोल सिस्टिम देण्यात आलं आहे.


TVS ने लाँच केली Radeon; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत


बाइकमध्ये आहे 5 राइडिंग मोड – या बाइकमध्ये रोड, रेन, स्पोर्ट्स ऑफ रोड आणि राइडर कॉन्फीग्युरेबल असे 5 राइडिंग मोड्स देण्यात आले आहेत. शिवाय यात राइड-बाय-वायर, हीटेड ग्रिप्स, क्रूज कंट्रोल, किलेस इग्निशन, टॉर्क अॅसिस्ट क्लच आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर सीटच्या आत मोबाइल ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2019 08:41 PM IST

ताज्या बातम्या