मुंबईत नवऱ्याने व्हॉट्सअॅपवरून दिला तिहेरी तलाक, 4 वर्षाच्या मुलासाह पत्नी बेघर

पाच वर्षांपूर्वी नजीम आणि आरजूचा विवाह झाला होता. त्यांना एक 4 वर्षाचा मुलगादेखील आहे.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 09:53 PM IST

मुंबईत नवऱ्याने व्हॉट्सअॅपवरून दिला तिहेरी तलाक, 4 वर्षाच्या मुलासाह पत्नी बेघर

भिवंडी, 07 मे : तिहेरी तलाक विरोधातील विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर देखील तोंडी तलाक देण्याच्या घटना समोर येत आहेत. मुंबईच्या भिवंडी शहरात तिहेरी तलाक दिल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मुस्लिम महिलेला व्हॉट्सअॅपवर तिहेरी तलाक देण्यात आला आहे.

आरजू शेख असं महिलेचं नाव आहे. तर नदीम शेख असं तिच्या पतीचं नाव आहे. नदीम शेख यानं आरजूला व्हॉट्सअॅपवर तलाक दिला. त्यामुळे आरजूचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी आता तिने पोलीस स्टेशन आणि महिला मंडळामध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे आता तिला न्याय मिळणार का बे पाहणं महत्त्वाचं आहे.

पाच वर्षांपूर्वी नजीम आणि आरजूचा विवाह झाला होता. त्यांना एक 4 वर्षाचा मुलगादेखील आहे. त्यामुळे या चिमुकल्याच्या भविष्याचा प्रश्न आरजूसमोर आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे तलाक दिल्यानंतर आरजूला नवऱ्याचं घर सोडावं लागलं. त्यामुळे सध्या ती मुलासह नातेवाईकांच्या घरी राहत आहे.

लोकसभेत 27 डिसेंबर रोजी तिहेरी तलाक विरोधातील विधेयक मंजूर करण्यात आहे. यानुसार तोंडी तलाक देणाऱ्यास 3 वर्षांची शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण यातून आता आरजूला न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

घरी येण्यास 10 मिनिटे उशिर झाल्याने दिला तलाक

Loading...

उत्तर प्रदेशमध्ये तिहेरी तलाकचा असाच एक अजब प्रकार उघडकीस आला होता. पत्नी घरी उशिरा आल्याने पतीने फोनवरून तलाक दिला गेला. एटा येथील रहिवासी असलेल्या महिलेला घरी येण्यास केवळ 10 मिनिट उशिर झाला. यावर संतप्त झालेल्या संबंधित महिलेल्या पतीने फोनवरूनच तलाक दिला.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार संबंधित महिला माहेरी गेली होती. घरातून निघताना महिलेने 30 मिनिटात परत येते, असं सांगितलं होतं. पण तिला येण्यास उशिर झाला. त्यावर पतीने महिलेला फोनवरून तीन वेळा तलाक-तलाक-तलाक असं म्हटलं.

पीडित महिलेने सासरच्या लोकांकडून मारहाण केली जात असल्याचा आरोप केला होता. लग्नाच्यावेळी मागण्यात आलेला हुंडा दिला नसल्याने मारहाण केली जात असल्याचं महिलेनं म्हटलं होतं. अशा प्रकारच्या मारहाणीमुळे एकदा गर्भपात करावा लागल्याचं तिने सांगितलं. दरम्यान, पीडित महिलेनं सरकारकडून मदत मागितली होती.


SPECIAL REPORT : भाईचा Bday.., शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्याने मिळून कापला 'आरारा' स्टाईल केक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 09:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...