तिहेरी तलाक गुन्हा ठरणार, केंद्राने काढला अध्यादेश

तिहेरी तलाक गुन्हा ठरणार, केंद्राने काढला अध्यादेश

तिहेरी तलाकला गुन्हा ठरविणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, ता. 19 सप्टेंबर : तिहेरी तलाकला गुन्हा ठरविणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिलीय. तिहेरी तलाक विधेयक लोकसभेने मंजूर केलं होतं मात्र राज्यसभेत ते मंजूर होऊ शकलं नाही. त्यामुळे सरकाने अध्यादेशाचा पर्याय स्वीकारला. कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली.

या अध्यादेशात मुस्लीम महिला विधेयकामध्ये असलेल्या सर्व तरतुदींचा समावेश आहे. राज्यसभेत सरकारकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने या विधेयकाला मंजुरी मिळणं सध्यातरी शक्य नव्हतं त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या विधेयकाच्या समिक्षेची आणखी गरज असून संसदेच्या संयुक्त समितीकडे अभ्यासासाठी हे विधेयक पाठवावं अशी काँग्रेसची मागणी आहे.

तर भाजप त्यासाठी तयार नाही. काँग्रेसच्या विरोधामुळे हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकलं नाही. या अध्यादेशानुसार तोंडी, लिखित किंवा फोनवर पतीने पत्नीला तलाक दिल्यास त्याला तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद या अध्यादेशात आहे. मुस्लीम महिलांना या विधेयकाचा फायदा मिळणार आहे. तर अनेक मुस्लीम संघटनांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला होता.

कायदा करण्याचा अधिकार हा संसदेलाच असून अध्यादेश काढला जावू नये असं मत सुप्रीम कोर्टानं मागच्या वर्षी व्यक्त केलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकांना काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना सरकारने हा अध्यादेश आणून मुस्लीम महिलांमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही होत आहे.

VIDEO: ट्रिपल सीट जाताना हटकलं म्हणून दुचाकीस्वारानं पोलिसावरच उचलला हात!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 03:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading