आदिवासी महिलांनी मोदींना बांधली बांबूची राखी!

आदिवासी महिलांनी मोदींना बांधली बांबूची राखी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिसादानंतर पहिल्यांदाच मेळघाटातील आदिवासी महिला त्यांना राखी बांधण्यासाठी देशाच्या राजधानीत पोहोचल्या आहेत.

  • Share this:

26 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिसादानंतर पहिल्यांदाच मेळघाटातील आदिवासी महिला त्यांना राखी बांधण्यासाठी देशाच्या राजधानीत पोहोचल्या आहेत. बांबूच्या राख्या तयार करणाऱ्या आदिवासी महिलांना  स्वत: ही राखी पंतप्रधानांना बांधायची होती. या माध्यमातून त्यांना त्यांच्यापर्यंत एक संदेश पोहोचवायचा होता.

आजही मेळघाटातील आदिवासी महिलांना स्नानगृहे उपलब्ध नाहीत. स्वच्छता अभियानाअंतर्गत याच महिलांनी  बांबूची १३५ स्नानगृहं तयार केली. दोन वर्षांपूर्वी या महिलांनी हीच कैफियत पोहोचवण्यासाठी खासदारांना पत्र लिहिले होते. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी संपूर्ण बांबू केंद्राचे सुनील देशपांडे यांच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधानांना राखी बांधण्याची गळ घातली.

देशपांडे यांनी आयटीसीआरचे महासंचालक विनय सहस्त्रबुद्धे यांना या महिलांचे विनंती पत्र पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले. सुमारे महिनाभरापूर्वीच या महिलांनी पंतप्रधानांना राखी बांधण्यासाठी विनंती पत्र पाठवले होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना पंतप्रधानांकडून होकार मिळाला. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'मन की बात' मधून पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहे.

बांबू म्हणजे मेळघाटचं हिरवं सोनंच. याच बांबूच्या कलात्मक वस्तू निर्मितीतून मेळघाटातील वनवासींना स्वावलंबी बनविण्याचे कार्य बांबू केंद्रामार्फत सुनील देशपांडे करीत आहेत. या बांबूच्या राख्या अतिशय सुंदर व कलात्मक असून, पर्यावरणपूरक आहेत. या राख्या खूप लोकप्रिय झाल्या असून, देश-विदेशातून या मेळघाटी राख्यांना मागणी वाढत आहे. या केंद्रामधील कोरकू बांधवांच्या कलाकौशल्यास मिळालेला हा सन्मान आहे. या निमित्ताने मेळघाटची कलाकुसर राष्ट्रीय स्तरावर पोहोचेल, असे लवादाच्या कोरकू महिला व केंद्राचे प्रमुख सुनील देशपांडे यांनी सांगितले.

First published: August 26, 2018, 9:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading