जीन्स नवी कोरी दिसावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर वाचा ‘या’ टिप्स

जीन्स नवी कोरी दिसावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर वाचा ‘या’ टिप्स

न धुतलेल्या जीन्सच्या कपड्यांमध्ये वाढतात बॅक्टरिया, त्वचारोगांसाठी ठरतात कारणीभूत

  • Share this:

मुंबई, 11 मे : डेनिम जीन्समुळे तुमचा लुक क्षणार्धात बदलतो. कदाचिक म्हणूनच जीन्स घालणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या कपाटात वेगवेगळ्या जीन्सचं कलेक्शन करते. जीन्सचं कलेक्शन करताना त्यांची काळजी घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं.अलीकडे फेडेड जीन्स प्रमाणेच जुन्या फाटलेल्या जीन्सचा नाव लूक असलेल्या जीन्सचा ट्रेण्डमध्ये आहेत. स्वच्छ आणि मळलेल्या जीन्समधला फरक हा पाताक्षणीच लक्षात येतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्या तुम्ही अमलात आणल्या तर तुमची चीन्स दिसेल अगदी नवी.

जाडे-भरडे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुणं जरा अवघडच जातं. याउपरही तुम्ही त्यात जीन्स धुतलीच तर ती स्वच्छ निघेलच हे सांगता येत नाही. म्हणून जीन्सचे कपडे हे नेहमी हातानेच धुण्याचा प्रयत्न करा. सहसा वॉशिंग मशिनमध्ये धुतलेले कपडे आखुडतात. जर तुम्ही जीन्सचे कपडे हानांनी धुतले तर शिलाईसाठी वापरण्यात आलेले त्यावरले दोरे स्वच्छ निघतात.

वजन कमी करण्यासाठी खा तूप; आरोग्य होईल सुदृढ

अनेकजण जीन्सचे कपडे महिनोंमहिने धूत नाहीत. त्यामुळे जीन्सच्या कपड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि ते त्वचारोगांना कारणीभूत ठरतात. घामामुळेसुद्धा त्यात दुर्गंधी निर्माण होते. धुतलेल्या जीन्स किंवा जीन्सचे इतर कपडे जर तुम्ही प्लास्टिकच्या बॅगमध्ये नीट घडी करून फ्रीजरमध्ये ठेवले तर या गोष्टींपासून बऱ्यापैकी तुमची सुटका होऊ शकते. या प्रक्रियेला स्टरलाइज करणं असं म्हणतात.

गुगल सांगतं - भारतीय लोक लग्नासाठी कमी आणि डेटिंगसाठी जास्त उत्सुक

जीन्स धुण्याआधी नेहमी त्याचा टॅग चेक करायला हवा. ती कशी धुवायची यासंदर्भातले दिशानिर्देश त्यात दिलेले असतात. जर त्यावर प्री-वॉश असं लिहिलेलं असेल तर ती फक्त थंड पाण्याने धुवावावी ज्यामुळे ती श्रिंक होत नाही. तसंच जीन्स वाळत घालताना त्यावर उन्हाची थेट किरणं पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. अन्यथा जीन्स खराब होऊ शकते. तर धुतल्यानंतर जीन्स नेहमी सुकण्यासाठी हवेशीर जागेवर ठेवावी. जीन्स धुतल्यानंतर ती परत एकदा फॅब्रिक सॉफ्टनरने धुतली तर ती नेहमी नवी कोरी दिसेल.

First published: May 11, 2019, 7:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading