News18 Lokmat

सावधान! ATM मशीनवर असतात जीवघेणे विषाणू; रिसर्चमध्ये आलं समोर

ब्रिटनच्या संशोथकांनी केलेल्या रिसर्चमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 10:47 PM IST

सावधान! ATM मशीनवर असतात जीवघेणे विषाणू; रिसर्चमध्ये आलं समोर

Digitalization च्या युगात ATM अपल्या जीवना एक अविभाज्य घटक बनली आहे. ATM चे अनेक फायदे अनेक असले तरी, नुकत्याच ब्रिटनच्या संशोथकांनी केलेल्या रिसर्चमध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. गरज पडताच ज्या ATM मधून तुम्ही पैसे काढता, त्यावर पब्लिक टॉयलेट सीटवर आढळणाऱ्या बॅक्टेरियांपेक्षाही (सूक्ष्मजंतू) जास्त बॅक्टेरिया आढळून आलेत.

ब्रिटनच्या संशोथकांनी केलेल्या ATM च्या की-पॅडची तपासणी केली. ज्यामध्ये मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक बॅक्टेरिया संशोधकांना आढळून आले. ATM च्या की-पॅडवर आढळून आलेले बॅक्टेरिया तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

या रिसर्चदरम्यान संशोधकांनी टॉयलेट सीट आणि एटीएम मशीन च्या की-पॅड्स वर आढळणाऱ्या बॅक्टेरियांचे नमुने घेऊन तपासणी केली. यात धक्कादायक निष्कर्ष समोर आले. त्यांनी केलेल्या तपासणीमध्ये डायरियासर अनेक आजार पसरवणारे हानिकारक बॅक्टेरिया एटीएमच्या किपॅडवर आढळून आले.

या रिसर्चचे निश्कर्ष पाहून माझी झोपच उडाली आहे, असं माइक्रोबायोलॉजिस्ट रिचर्ड हैसिंग म्हणतात. हा रिसर्च 'बायोकोट' नावाच्या ऐंटीबॅक्टेरियल प्रॉडक्ट्स विकणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 10:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...