रात्री झोपण्यापूर्वी 'हे' करा; होईल मोठा फायदा

रात्री झोप येत नसेल तर काय करता तुम्ही?

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 09:15 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी 'हे' करा; होईल मोठा फायदा

रात्री अंथरुणावर पडताच अनेकांना झोप लागत नाही. मग मोबाईलवर गेम्स किंवा सोशल मीडिया स्क्रोल करता करता कधी झोप लागते हे त्यांचं त्यानाच कळत नाही. अशापद्धतीने वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याचा सद्उपयोग तुम्ही करू शकता.

रात्री झोपण्यापूर्वी 'माझा आजचा दिवस कसा गेला?', 'मी आज दिवसभार कोणकोणती कामं केली? येणारे दिवस आणखी कसे चांगले होतील? असे विचार तुम्ही कधी केलेत का? नसतील तर, आजपासूनच करयाला लागा ज्यामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होईल.

डायरी लिहा - दिवसभर तुम्ही जी कोणती कामे केली, लोकांप्रती तुमचा व्यवहार कसा राहिला, तुम्ही किती मित्र बनवलेत, किंवा जीवनशी निगडीत तुमच्या कल्पना अशा काही गोष्टी तुम्ही डायरीमध्ये लिहा. भविष्यात जेव्हा-केव्हा तुम्ही ती डायरी उघडून बघाल, तेव्हा मिळवलेलं यश पाहून तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. डायरी ही तुमच्या व्यक्तिगत जीवनाचा लेखाजोखा असते त्यामुळे ती इतरांना वाचता येणार नाही याची काळजी घ्या.

Loading...

मूल्यांकन करा - अनेकदा असं होतं की, आपलं मित्रांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत कुठल्यातरी कारणावरून वाद किंवा मतभेद होतात. अशावेळेस आपल्या वर्तनाचे मूल्यांकन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ते करत असताना तुम्हाला निश्चित जाणवेल की ती परिस्थिती तुम्हाला उत्तम प्रकारे हाताळता आली असती. यातून तुम्ही लगेच कुणावर रियाक्ट होण्याएवजी त्यांना प्रतिसाद द्यायला शिकता.

टार्गेट निश्चित करा - ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुम्ही किती उत्तम प्रकारे काम करू शकता याचा विचार तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करा. अशी कोणती गोष्ट आहे जी केली तुम्ही स्वतःला ऊंच शिखरावर पोहोचवाल. म्हणून दुसरा दिवस उगवण्यापूर्वीच तुम्ही त्या दिवसाचं टारगेट फिक्स करा आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण जीव ओतून आपलेच स्वतःचे जुने रेकॉर्ड ब्रेक करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, तुमची स्पर्धा ही फक्त तुमच्याशीच राहणा आहे. इतरांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही एका विशिष्ठ लक्ष्यच गाठू शकाल.

स्वतःचे आभार माना - पूर्ण दिवसात तुमच्या जीवनात जे काही चांगलं किंवा वाईट झालं त्याप्रती मनापासून तुम्ही भगवंताचे आभार माना. असं केल्याने तुमच्या मनात कृतज्ञतेचा भाव निर्माण होईल जो तुम्हाला आणखी सकारात्मक बनवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2019 09:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...