OMG VIDEO : श्री गणेश नव्हे तर हा आहे ट्री गणेश! विसर्जनानंतरही बाप्पा असा राहतो तुमच्या घरी

OMG VIDEO : श्री गणेश नव्हे तर हा आहे ट्री गणेश! विसर्जनानंतरही बाप्पा असा राहतो तुमच्या घरी

ही गणेशमूर्ती बनली की त्यामध्ये बिया रुजवल्या जातात. या मूर्तीचं विसर्जन पाण्यात नाही तर बाप्पाला पाण्यात न्हाऊ घालून केलं जातं. चार-पाच दिवसांत या मूर्तीतून सुंदर हिरवंगार रोपटं उगवून येतं !

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : कल्पना करा... तुम्ही घरी गणपतीची सुबक मूर्ती आणलीय आणि तिचं विसर्जन केल्यानंतर त्यातून एक हिरवंगार रोपटं उगवून आलंय! हा आहे ट्री गणेश!इकोफ्रेंडली गणेश.

सध्या सगळीकडे गणरायांच्या आगमनाचा उत्साह आहे. गणपती आणताना शाडूच्या लहान मूर्ती आणा आणि इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, असा संदेश दिला जातो.असं असलं तरीही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं प्रमाण जास्त आहे. अशा गणेशमूर्तींचं विसर्जन केलं तर त्याचा समुद्र, तलाव आणि एकूणच पर्यावरणावर घातक परिणाम होतो.

दत्ताद्री कोथुर या तरुणाला हे प्रदूषण टाळण्यासाठी काहीतरी करावंसं वाटलं. त्याने यावर एक कल्पक उपाय काढला आणि इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनवल्या. या मूर्ती लाल मातीच्या बनवल्या जातात. याला रंग देण्यासाठीही ऑरगॅनिक रंगांचा वापर होतो. मूर्ती बनली की त्यामध्ये बिया रुजवल्या जातात. झाडांची वाढ व्हावी म्हणून सेंद्रीय खतंही घातली जातात.

या मूर्तीचं विसर्जन पाण्यात नाही तर बाप्पाला पाण्यात न्हाऊ घालून केलं जातं. चार-पाच दिवसांत या मूर्तीतून सुंदर हिरवंगार रोपटं उगवून येतं !

खूशखबर! रेकॉर्डब्रेक वाढीनंतर सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

दत्ताद्री कोथुर यांनी 2015 मध्ये या ट्री गणेश ची सुरुवात केली. आता त्यांच्या या गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे.

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भाविक गणरायाला निरोप देतात. आणि हा गणरायाही जाताजाता भक्तांना असा हिरवागार आशिर्वाद देऊन जातो.

=================================================================================================

लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 08:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading