आजपासून मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप

आजपासून मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप

आजपासून मालवाहतूकदार देशव्यापी संपावर जातायत.थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये 50 टक्यांची वाढ झाल्याच्या निषेधार्थ हा संप होतोय.

  • Share this:

08 एप्रिल : आजपासून मालवाहतूकदार देशव्यापी संपावर जातायत.थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये 50 टक्यांची वाढ झाल्याच्या निषेधार्थ हा संप होतोय. एक एप्रिलपासून ही वाढ लागू झाली आहे. त्याच्या निषेधार्थ हा संप होतोय.

पुण्यात मालवाहतूकदार पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत हा संपाचा निर्णय घेण्यात आला. शिवाय वाहनांच्या परिवहन शुल्कात वाढ झाली, ती वाढ कमी करण्याचं आश्वासन देऊनही फार काही झालं नाही. आंदोलनात तोही मुद्दा आहेच.

याशिवाय मालवाहतूकदारांच्या संघटनांनी टोलचाही मुद्दा उपस्थित केलाय. त्यांच्या मते सरकारनं एकदमच टोल घ्यावा, जेणे करून टोल देण्यात लागणारा वेळ वाचेल.

महाराष्ट्र मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, 'सहा राज्यांत हा संप सुरू होताच. आता उर्वरित राज्यांत आजपासून सुरू होतोय.'

या चक्काजाम आंदोलनात ट्रक ,टेंपो सहभागी होणार आहेत. पण शाळांच्या परीक्षा सुरू असल्यानं स्कुलबसेस यातून वगळण्यात आल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 10:07 AM IST

ताज्या बातम्या