Elec-widget

तृतीयपंथींच्या कामावर तुम्हालाही अभिमान वाटेल, आयुष्यभराची जमापुंजी वापरून साकारलं स्वप्न

तृतीयपंथींच्या कामावर तुम्हालाही अभिमान वाटेल, आयुष्यभराची जमापुंजी वापरून साकारलं स्वप्न

तृतीयपंथीय म्हटलं की समाज त्यांच्या पासून चारहात लांबच राहणं पसंद करतो. अशावेळी समाजचं काय आपल्या पोटच्या लेकरालाही जवळ केलं जात नाही.

  • Share this:

हरिष दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 06 मे : समाजाने आणि घरच्यांनीही झिडकारलेल्या तृतीयपंथीयांनी एकत्र येत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं आपल्या हक्काच्या सुसज्ज अशा आश्रमाची निर्मीती केली आहे. आयुष्यात आतापर्यंत जमवलेली जमापुंजी खर्च करून उभारलेल्या या वास्तुमध्ये तृतीयपंथीय हक्काने राहू शकणार आहेत तर त्यांच्या कलागुणांनाही इथे वाव मिळणार आहे.

तृतीयपंथीय म्हटलं की समाज त्यांच्या पासून चारहात लांबच राहणं पसंद करतो. अशावेळी समाजचं काय आपल्या पोटच्या लेकरालाही जवळ केलं जात नाही. त्यामुळेच समाजाने झिडकारलेल्या तृतीयपंथीयांना आपल्या हक्काचं घर असावं यासाठी काही वर्षांपूर्वी शेखगुरू यांनी श्रीरामपूर इथे दयारची निर्मीती केली होती.

मात्र, साधारण पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या या आश्रमात राहणं अवघड झालं होतं. त्यामुळे याठिकाणी एक सुसज्ज इमारत बांधावी या संकल्पनेतून जिल्ह्यातील 100 तृतीयपंथीयांनी आपल्याकडची जमापुंजी या कामासाठी दिली आणि सर्वधर्माच्या तृतीयपंथीयांसाठी हे दयार उभं राहिलं.

हेही वाचा : दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले, भावाने केला...

Loading...

कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आपल्या आत्तापर्यंतच्या कमाईतून हे घर सर्व तृतीयपंथीयांनी साकारलं आहे. तब्बल 2700 स्क्वेअर फूट बांधकाम असलेल्या या आश्रमातून सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यात आला. धर्म, जात, पंथ या गोष्टींना फाटा देत  साकारलेल्या या घरात एकीकडे साईबाबांचं मंदिर तर दुसरीकडे दर्गा उभारण्यात आला आहे.

हे सगळं साध्य करण्यासाठी खुप झडावं लागलं. माणूस म्हणून तृतीयपंथींनाही जगण्याचा हक्क आहे. त्यामुळे सरकारनेही आमच्या समस्यांकडे एकदा लक्ष द्यावं अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष काजल गुरू यांनी व्यक्त केली आहे.

देशाच्या स्वातंत्र्य प्राप्ती नंतर तृतीयपंथी समाज सरकारी योजनांपासून दूरच राहिला. अनेकदा मागणी करूनही पदरी निराशाच आली. मात्र, आता या समाजाने एकत्र येऊन स्वतःचा विकास स्वतःच करण्याचा घेतलेला ध्यास अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

VIDEO: '...पण जबरदस्तीनं पंजाचं बटण दाबायला लावलं' आजीबाईंचा गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...