उल्हासनगर, 19 डिसेंबर: आतापर्यंत आपण अनेक फॅशन शो पाहिले असतील. मात्र, उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) चक्क तृतीय पंथीय (Third Gender)आणि ट्रान्सजेंडर (transgender)यांचा फॅशन शो मोठ्या दिमाखात पार पडला.
वाण्या फाउंडेशन आणि किन्नर अस्मिता या संस्थांतर्फे या आगळ्यावेगळ्या फॅशन शोचं उल्हासनगर शहरात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आमदार, पोलीस आणि सामाजिक संस्थेच्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
हेही वाचा...आदित्य नारायणने शेअर केले श्वेतासोबतचे रोमँटिंक PHOTO;हनीमूनसाठी निवडलं हे ठिकाण
या फॅशन शोमध्ये तृतीयपंथी त्याचबरोबर महिला आणि पुरुषांमधील ट्रान्सजेंडरांनी देखील संगीताच्या तालावर चक्क रॅम्प वॉक केला. उल्हासनगर कॅम्प 3 च्या रेजन्सी हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या फॅशन शो बरोबरच तृतीयपंथीय आणि ट्रान्सजेंडरांसाठी नृत्यु स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून 44 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. फॅशन शोमध्ये तृतीयपंथीय आणि ट्रान्सजेंडर्सनी रॅम्प वॉकवर आपला जलवा दाखवला.
VIDEO एकदा पाहाच... तृतीयपंथी आणि ट्रान्सजेंडर्सनी असा केला रॅम्प वॉक pic.twitter.com/y9H50ifqZy
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) December 19, 2020
18 डिसेंबर हा "अल्पसंख्यांक हक्क दिवस" असल्याने त्या निमित्तानं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाज अजूनही तृतीयपंथी आणि ट्रान्सजेंडरांना स्वीकारत नाही, समानतेची वागणूक देत नाही. त्यांना देखील सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. हे दाखवण्यासाठी आजचा हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचे वाण्या फाउंडेशनच्या रेखा ठाकूर आणि किन्नर अस्मिता संस्था सदस्य लकी यांनी सांगितलं.