मुंबई, 23 फेब्रुवारी : हेरिटेज आठवड्याच्या निमित्ताने नेरळ माथेरान वाफेच्या इंजिनावर ट्रेन धावली. नेरळ ते माथेरान हे साधारण दोन तासांच अंतर आहे. पण तासभर वाफेच्या इंजिनावर ट्रेन चालल्याने लोकांना जुना काळ अनुभवता आला. या ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या मध्ये वरिष्ठ नागरिकांसह रेल्वेच्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांनाही प्रवास केला. विस्ताडोम म्हणजेच दोन्ही बाजूला भल्यामोठ्या काचा आणि छतही काचेचा असलेल्या या डब्यातून प्रवास करण्याचा आनंद रेल्वे प्रेमींनी घेतला.