क्रूरतेची परिसीमा ! चालत्या ट्रेनमधून प्रवाशाने मारली लाथ, ट्रॅकमनचा मृत्यू

क्रूरतेची परिसीमा ! चालत्या ट्रेनमधून प्रवाशाने मारली लाथ, ट्रॅकमनचा मृत्यू

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या रेल्वे सेवा सुरळीत सुरू राहावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावं यासाठी प्रत्यक्षरित्या झटणारे ट्रॅकमॅन एका प्रवाशाच्या अमानवीय आणि निष्काळजीपणाचा बळी ठरला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या रेल्वे सेवा सुरळीत सुरू राहावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावं यासाठी प्रत्यक्षरित्या झटणारे ट्रॅकमॅन एका प्रवाशाच्या अमानवीय आणि निष्काळजीपणाचा बळी ठरला आहे. दरवाज्यामध्ये उभा राहून टवाळक्या करणाऱ्या एका प्रवाश्याने लाथ मारल्याने श्रावण सानप (47) यांचा लोकलला धडकून मृत्यू झाला आहे.

लोकलने प्रवास करणारे अनेक प्रवासी दरवाजात उभं राहतात आणि फलाटावरील लोकांना शिट्या मारणं, धावत्या लोकलसोबत स्टंट करणं असं प्रकार करत असतात. पण त्यांची ही मस्ती ट्रॅकमॅनच्या जीवावर बेतली आहे. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी आणि लोअर परळ स्थानकादरम्यान आपल्या ८ साथीदारांसोबत ट्रॅकची पाहणी करत असताना दुसऱ्या बाजूने लोकल येत होती त्यामुळे ते दोन्ही टॅकच्यामध्ये उभे राहिले. पण चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील दरवाजात उभा असणाऱ्या एका प्रवाशाने त्यांना लाथ मारली आणि तो समोर आलेल्या ट्रेनला जोरात धडकले. या धडकेत ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

आंदोलनाचा राग माझ्यावर का?, केलं ८६ लाखांचे नुकसान

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, पश्चिम रेल्वे पोलिसांनी घटनेची दाखल घेत सीसीटीव्ही तपासून आरोपीला शोधण्याचं काम सुरू आहे. खरंतर सानप यांना डॉक्टर आणि अन्य सहाय्यकांच्या अभावामुळे १०८ क्रमांकाची तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात नेण्याची सोय करण्यात आली. पण दुर्देवाने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

कोणाच्यातरी अमानवी कृत्यामुळे असे अजून किती रेल्वे अपघात होणार असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतो. अशी मस्ती आणि कृत्य करणाऱ्यांवर सरकारने तर आळा घालणं महत्त्वाचं आहे. पण आपली मस्ती एखाद्या जीवावर बेतली याची लाज बाळगत आपणच आपली मानसिकता बदलली तर असे प्रकार थांबण्यास नक्कीच मदत होईल.

हेही वाचा...

अकरावीची तिसरी यादीही लांबणीवर, विद्यार्थ्यांचे हाल

नवी मुंबईत जनजीवन सुरळीत पण सुरक्षेसाठी इंटरनेट सेवा बंद

'चलो अयोध्या, चलो वाराणसी', शिवसेनेची होर्डिंगबाजी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading