ग्राहकांना चॅनेल निवडण्याची संधी दिली नाहीत तर.... TRAI ने दिला सज्जड दम

नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना भोगावे लागतील गंभीर परिणाम.

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 05:07 PM IST

ग्राहकांना चॅनेल निवडण्याची संधी दिली नाहीत तर.... TRAI ने दिला सज्जड दम

नव्या नियमांचं पालन न करणाऱ्या केबल टीव्ही आणि DTH (डायरेक्ट टू होम) सेवा देणाऱ्या कंपन्यांना टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने सावधतेचा इशारा दिला आहे. नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही TRAI ने म्हटलं आहे.

यासाठी DTH कंपन्यांच्या विरोधात TRAI लवकच सेवा व्यवस्थापन आणि IT प्रणालीचं ऑडिट सुरू करणार आहे. ग्राहकांची आवड आणि त्यांचं हित लक्षात घेता, अशा कंपन्याविरोधात कोणतिही हयगय केली जाणार नसल्याचं TRAI चे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी सांगितलं.

ग्राहकांकडून आम्हाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यात ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार पर्याय निवडता येत नसल्याच्या तक्रारी सर्वात जास्त असल्याचं शर्मा म्हणाले.

Loading...

ग्राहकांना त्यांच्या अवडीचे चॅनल्स निवडता या मुळ संकल्पनेवरच या नव्या बदलाची रुपरेशाच आधारित आहे. जर त्यालाच तडा जात असले, तर DTH कंपन्या पॅकेज आणि अजेंड्याला महत्त्व देत आहेत हे स्पष्ट होतं. जे नियमाच्या विरूद्ध आहे, असं शर्मा म्हणाले.

ग्राहक स्वतः एखादं पॅकेज निवडत असतील तर ठीक, पण त्यांना पर्याय निवडायचे असतील तर ती सुविधा त्यांना मिळायलाच हवी. जर DTH कंपनी ही सुविधा ग्राहकांना देऊ शकत नसेल, तर नियमांचं उल्लंघन समजून त्यांच्यावर गंभीर कारवाई केली जाईल आणि वितरकांना नोटीस बजावली जाईल असंही TRAI ने म्हटलं आहे.

आत्तापर्यंत 9 DTH आणि केबल कंपन्यांना दिशानिर्देश जारी करण्यात आले असून, 5 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचं TRAI च्या अध्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: TRAI
First Published: Apr 23, 2019 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...