IUC शुल्कावर होणार 'हा' निर्णय, पुन्हा फ्री कॉल करता येणार

IUC शुल्कावर होणार 'हा' निर्णय, पुन्हा फ्री कॉल करता येणार

मोबाइल कॉलवर लागू करण्यात येणाऱ्या 6 पैशांचे आययुसी शुल्क बंद करण्यावर दोन कंपन्या वगळता सर्वच ऑपरेटर्सनी सहमती दर्शवली.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : टेलिकॉम रेल्युलेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने देशातील टेलिकॉम कंपन्यांसह काही प्रतिनिधींशी आयुसीबाबत चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. यामध्ये मोबाइल कॉलवर लागू करण्यात येणाऱ्या 6 पैशांचे आयुसी शुल्क बंद करण्यावर जवळपास सर्वच ऑपरेटर्सनी सहमती दर्शवली. यामध्ये फक्त एअरटेल आणि व्होडाफोन यांनी मात्र विरोध केला. देशातील टेलिकम्युनिकेशन कंपन्या आणि इतर पदाधिकारी असे मिळून 155 जणांनी यामध्ये भाग घेतला होता. रिलायन्स जिओ, बीएसएनएल, एमटीएनएलसह इतर कंपन्याही यासाठी उपस्थित होत्या.

अनेक कंपन्यांनी आयुसी चार्जेस हटवण्याच्या बाजूने सकारात्मक असल्याचं म्हटलं. मात्र, एअरटेल आणि व्होडाफोन यांनी विरोध केला. दूरसंचार आयोगाचे माजी सदस्य एसएस सिरोही यांनी म्हटलं की, ट्रायच्या रेग्युलेशनच्या 2017 च्या पेपरनुसार आयुसी चार्जेस 1 जानेवारी 2020 च्या आधी बंद होतील. ही तारीख पुढे ढकलली जाणार नाही. बी अँड के दूरसंचारसाठी सर्वात चांगले असून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी केली पाहिजे.

सिरोही म्हणाले की, ट्रायचा कन्सल्टेशन पेपर एक जानेवारी तारीख पुढे ढकलण्याबाबत का हे आश्चर्यकारक आहे. प्रश्न आधीच तयार आहेत आणि त्यावर सप्टेंबरमध्ये चर्चा झाली आहे. तसेच जर आयुसी चार्जेस हटवले नाही तर ग्राहक नाराज होतील. असं असतानाही ट्रायने पेपर जारी केला असा सवालही त्यांनी विचारला.

ट्रायने सप्टेंबरमध्ये बी अँड के म्हणजेच झिरो टर्मिनेशन चार्ज सिस्टीम लागू करण्याची तारीख बदलण्यासाठी संबंधितांची मते मागवली होती. त्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली होती. याशिवाय त्याच्या नियमांबद्दलही सूचना देण्यास सांगितलं होतं. एक जानेवारी 2020 पासून आयुसी चार्जेस हटवल्यास फ्रि कॉलिंग कोणत्याही नेटवर्कवर करता येणार आहे.

IUC चार्ज म्हणजे काय?

इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क.

देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आग्रही आहे.

TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे.

जेव्हा स्मृती इराणी तलवारबाजी करता, पाहा हा VIDEO

Tags: JIO
First Published: Nov 16, 2019 10:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading