मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

हेल्मेट न घालणाऱ्यांनी निबंध लिहिण्याची सवय ठेवा, ट्रॅफिक पोलिसांचा नवा फंडा

हेल्मेट न घालणाऱ्यांनी निबंध लिहिण्याची सवय ठेवा, ट्रॅफिक पोलिसांचा नवा फंडा

हेल्मेट न घालणाऱ्या व्यक्तीला 1000 रुपये दंड आणि तीन महिन्यासाठी परवाना रद्द होऊ शकतो. तरीही अनेक लोक दोनचाकी चालवताना हेल्मेट घालत नाही.

हेल्मेट न घालणाऱ्या व्यक्तीला 1000 रुपये दंड आणि तीन महिन्यासाठी परवाना रद्द होऊ शकतो. तरीही अनेक लोक दोनचाकी चालवताना हेल्मेट घालत नाही.

हेल्मेट न घालणाऱ्या व्यक्तीला 1000 रुपये दंड आणि तीन महिन्यासाठी परवाना रद्द होऊ शकतो. तरीही अनेक लोक दोनचाकी चालवताना हेल्मेट घालत नाही.

    भोपाल, 18 जानेवारी : वाहन चालवताना सुरक्षा किती गरजेची असते हे सर्वांना माहित असते. मात्र, त्या सुरक्षेसाठी तुम्ही-आम्ही कधीच नियम पाळत नाही. त्यामुळे अनेक अपघात होत असातात त्यातील जास्त घटना ही दुचाकी अपघाताच्या असतात. हेल्मेट घालून बाईक चालवा असे पोस्टर आणि यासाठी जागरुकता करणारे कार्यक्रम सुद्धा ठेवले जातात. गेल्य़ाच वर्षी वाहनाचे नवीन नियम तयार करण्यात आलं आहे. त्यानुसार हेल्मेट न घालणाऱ्या व्यक्तीला 1000 रुपये दंड आणि तीन महिन्यासाठी परवाना रद्द होऊ शकतो. तरीही अनेक लोक दोनचाकी चालवताना हेल्मेट घालत नाही. भोपाल पोलिसांनी यावर नविन उपाय सुरू केला आहे. तुम्ही ट्रॉफिक पोलिसांनी हेल्मेट न घातलेल्या व्यक्तीकडून दंड घेताना पाहिलेच असेल. मात्र तुम्ही काही वेगळ्या स्वरुपात दंड घेताना पोलिसांना पाहिले आहे का?  कदाचित नसेलच पाहिलं. मात्र देशातील अनेक ट्राफिक पोलिसांना दंड स्वरुपात वाहन चालकांकडून हेल्मेट विकत घ्यायला लावून मोठ्या प्रमाणात दंड देखील वसूल केला आहे. त्यासोबत वाहन चालकांना ट्रॉफी किंवा लाडू देऊन सत्कार देखील करण्यात आला. आता मध्य प्रदेशमधील पोलिसांनी वाहन चालकानमध्ये जागरुकता आण्यासाठी नविन युक्ती लढवली आहे. भोपालमधील ट्रॉफिक पोलीस हेल्मेट न घालणाऱ्याकडून निबंध लिहून घेत आहे की, हेल्मेट का नाही घातला. इतर बातम्या - महिला प्रायव्हेट पार्टमध्ये का ठेवतात तंबाखू? डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा भोपालमधील पोलिसांनी आतापर्यत 150 वाहन चालकाकडून निबंध लिहून घेतले आहे. सूत्रानी दिलेल्य़ा माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी वाहन चालकाकडून 100 शब्दाचा निबंध लिहून घेत आहे की, त्यांनी का हेल्मेट घातला नाही. याच्याव्यतरिक्त भोपाळ पोलिसांनी रॅली काढून जागरुकता मोहिम सुरू केली आहे. ऑटो ड्राव्हर्स साठी डोळे तपासनीचे कॅम्प सुरू केले आहे. इतर बातम्या - जोरदार धडकेत 'बोलेरो'चा चेंदामेंदा, भीषण अपघातात तृतीयपंथीयासह शिक्षक ठार
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Bhopal

    पुढील बातम्या