...म्हणून सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर वाहतूक पोलिसांची कारवाई!

...म्हणून सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर वाहतूक पोलिसांची कारवाई!

समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तीबरोबर संवाद साधण्यासाठी सुप्रिया सुळेचा यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण कार्यक्रमाला येताना त्यांच्या ताफ्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

  • Share this:

सोलापूर, 24 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. मोटर वाहन कायद्याअंतर्गत वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शहर वाहतूक पोलीस विभागाच्यावतीने ही कारवाई झाली आहे.

समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तीबरोबर संवाद साधण्यासाठी सुप्रिया सुळेचा यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण कार्यक्रमाला येताना त्यांच्या ताफ्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. ताफ्यातील 8 गाड्यांवर दोनशे रुपये प्रमाणे कारवाई केली गेली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेतून सुप्रिया सुळेंनी आज मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं. अजित पवारांचं नाव टीआरपीचा विषय असल्यानं महाराष्ट्र सहकार बँकेच्या घोटाळ्यात सरकारकडून त्यांचं नाव पुढे केलं जातं आहे असा आक्षेप सुप्रिया सुळेंनी घेतला. तसंच मुख्यमंत्र्यांनी सहकाराचा उल्लेख स्वाहाकार असा केला होता त्यावरूनही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचा असंवेदनशील असा उल्लेख केला.

सुप्रिया सुळेंनी आज पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं त्यावेळी त्या बोलत होत्या. देशातल्या मंदीबाबत बोलताना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य माणूस भरडला जात असल्याचा आरोपही सुप्रिया यांनी केला आहे. दरम्यान, आजच अरणगावात सुळेंच्या जनसंवाद यात्रेचा समारोपही करण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमी - सेना-भाजपच्या युतीचे थर कोसळणार, चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत

कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने केस दाखल करणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघातून काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेचा समारोप नगर तालुक्यातील अरणगाव इथे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित करण्यात आला. 6 ऑगस्टला या यात्रेला निघोज इथून प्रारंभ झाला होता. यावेळी बोलताना सुळे यांनी फडणवीस सरकारच्या विविध घोषणांवर टीका केली.

इतर बातम्या - BREAKING: दहीहंडी उत्सवाला गालबोट, पाचव्या थरावरून कोसळून गोविंदाचा मृत्यू

कर्जमाफीची घोषणा करून प्रत्येक्षात कर्जमाफी मिळालीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या या सरकारवर शेतकऱ्यांच्या वतीने केस दाखल करणार असल्याचा इशारा यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना घरबसल्या आम्ही सरसकट कर्जमाफी दिली होती. त्यासाठी आताच्यासारखी ऑनलाईन आणि जोडीने शेतकऱ्यांना उभं नव्हते केलं असा टोलाही त्यांनी लगावला.

VIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 09:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading