नाताळ सुट्ट्यांमुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी

नाताळ सुट्ट्यांमुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी

नाताळ आणि आजपासून सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या गाड्यांना ट्राफिक जॉमचा सामना करावा लागतोय....ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक कालपासून ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे.

  • Share this:

23 डिसेंबर, मुंबई : नाताळ आणि आजपासून सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या गाड्यांना ट्राफिक जॉमचा सामना करावा लागतोय....त्याच ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम चाललंय. ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक कालपासून ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

२५ डिसेंबरपर्यंत 'नो एण्ट्री' करण्यात आली आहे. याचदरम्यान वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेने केले आहे. यामुळे नवी मुंबईकडून बेलापूर रोडने आणि ऐरोली पटणी कंपनी मार्गे विटावा-कळवा- ठाण्याचे दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनास पटणी कंपनीकडून बेलापूर रोडला मिळणा-या ठिकाणी प्रवेश बंद केला आहे.

First Published: Dec 23, 2017 11:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading