चीननंतर आता भारत - अमेरिका 'व्यापार युद्ध'; ट्रम्प भारताला देणार मोठा धक्का?

चीननंतर आता भारत - अमेरिका 'व्यापार युद्ध'; ट्रम्प भारताला देणार मोठा धक्का?

भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार सुद्ध सुरू होऊ शकतं. कारण, अमेरिकेनं भारताचा जीएसपीचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 5 मार्च : चीन - अमेरिकेतील व्यापार युद्धानंतर आता भारत आणि अमेरिकेत देखील व्यापार युद्ध सुरू झालं आहे. भारतात अमेरिकी उत्पादनांवर मोठया प्रमाणात कर आकारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार अमेरिका भारताचा जीएसपी अर्थात विशेष प्राधान्य दर्जा काढून घेणार आहे. त्यामुळे अमेरिकेतील भारताच्या व्यापाऱ्याला मोठा फटका बसणार आहे.

जीएसपीचा दर्जा असल्यानं भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या ५.६ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर कुठलाही कर लावला जात नाही. 1970मध्ये अमेरिकेनं भारताला हा दर्जा दिला होता. त्यामुळे अमेरिकेनं भारताचा विशेष प्राधान्याचा दर्जा काढल्यास भारतातील 2000 वस्तुंना त्याचा फटका बसणार आहे. तर, तज्ज्ञांच्या मते ज्वेलर्सना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

काय म्हणाले ट्र्म्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी भारताबरोबर बरीच चर्चा झाली. पण, अमेरिकेतील उत्पादनांना भारतातील बाजारपेठांमध्ये समन्यायी वागणूक देण्याबाबत भारताकडून ठोस असं आश्वासन मिळालेलं नाही. त्यामुळे आपण भारताचा GSP दर्जा काढण्याचा विचार करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी टर्कीचा देखील उल्लेख केला आहे.

दरम्यान, अधिसूचना निघाल्यानंतर दोन महिन्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. जीएसपीचा भारत हा सर्वात मोठा लाभार्थी आहे. त्यामुळे व्यापारामध्ये भारताला सर्वात मोठा धक्का बसू शकतो.

चर्चा सुरू, कुणाला होणार फायदा?

या मुद्यावर सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. यामध्ये अमेरिकेनं ई - कॉमर्स कंपन्यांना देखील सहभागी करून घेतलं आहे. पण, याचा सर्वाधिक फायदा हा अमेरिकेला होईल. कारण, कोणत्याही कराशिवाय अमेरिकेतील वस्तु भारतातील मार्केटमध्ये प्रवेश करतील आणि हळहळू व्यापारावर कब्जा मिळवतील.

हा VIDEO पाहिल्यावर तुमचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही

First published: March 5, 2019, 1:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading