• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : धबधब्यात खूप वेळ एकमेकांना घट्ट पकडलं, पण एक-एक करून पाण्यात गेले वाहून!
  • VIDEO : धबधब्यात खूप वेळ एकमेकांना घट्ट पकडलं, पण एक-एक करून पाण्यात गेले वाहून!

    News18 Lokmat | Published On: Aug 15, 2018 08:20 PM IST | Updated On: Aug 15, 2018 08:20 PM IST

    मध्य प्रदेश, 15 ऑगस्ट : मध्य प्रदेशच्या शिवपुरी-सुलतानगढ़मधल्या धबधब्याचं पाणी अचानक वाढल्य़ाने मोठा अपघात झाला आहे. 31 जणांपैकी तब्बल 17 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. तर 8 जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर अजून अनेक पर्यटक यात अडकून आहेत. रेस्क्यु ऑपरेशनच्या मदतीने 8 जणांना एअरलिफ्ट करण्यात आलं आहे. कोणतीही माहिती आणि अधिसुचना न देता डॅममध्ये पाणी सोडल्याने धबधब्याचं पाणी अचानक वाढलं आणि त्यात हा मोठा अपघात झाला आहे. यात तब्बल 17 जण वाहून गेले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की कशा पद्धतीने पर्यटक पाण्याच्या मोठ्या प्रवाहात अडकले आहेत. पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की यात काही लोक वाहून गेले आहेत. खरंतर या व्हिडिओमधली दृष्य तुम्हाला विचलीत करू शकतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी