सोनाक्षी सिन्हाने केलं हेलनच्या गाण्यावर डान्स, रिलीज झालं Total Dhamaal चं ‘मुंगडा’ गाणं

सोनाक्षी सिन्हाने केलं हेलनच्या गाण्यावर डान्स, रिलीज झालं Total Dhamaal चं ‘मुंगडा’ गाणं

विनोद खन्ना यांच्या ‘इन्कार’ सिनेमातील ‘मुंगडा’ या हिट गाण्याचं रिमेक टोटल धमालत करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, ०५ फेब्रुवारी २०१९- अजय देवगणचा आगामी सिनेमा ‘टोटल धमालची’च सध्या सगळीकडे चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमाचं पहिलं गाणं सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे.

‘मुंगडा’ या गाण्यात सोनाक्षी सिन्हा अजय देवगणसोबत थिरकताना दिसत आहे. विनोद खन्ना यांच्या ‘इन्कार’ सिनेमातील ‘मुंगडा’ या हिट गाण्याचं रिमेक टोटल धमालत करण्यात आला आहे. विनोद खन्ना यांच्या सिनेमातील या गाण्यावर सुपरहिट डान्सर हेलन यांनी डान्स केला होता. आजही हेलन यांचं हे मूळ गाणं अनेक संगीत कार्यक्रमांना आवर्जुन लावलं जातं.

इंदर कुमार यांच्या ‘टोटल धमाल’ सिनेमात या गाण्याला वेगळा टच देण्यात आला आहे. गौरव- रोशीन यांनी हे गाणं कम्पोज केलं असून आदिल शेख याने कोरिओग्राफ केलं आहे. या गाण्यात सोनाक्षीसोबत अजय देवगणही थिरकताना दिसत आहे.

अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अर्शद वारसी आणि रितेश देशमुख यांच्या आगामी ‘टोटल धमाल’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. धमाल सिनेमाच्या सिरीजमधील हा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही इंद्र कुमार यांनी केलं आहे.

यावेळी धमालची मजा तिप्पट होणार आहे. या सिनेमात यावेळी सिंहापासून ते सापापर्यंत आणि सायकलपासून ते हॅलिकॉप्टरपर्यंत सारं काही दिसणार आहे. विनोदी पटात गणती करण्यात आलेल्या टोटल धमाल सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे. या सिनेमातही आधीच्या सिनेमाप्रमाणे सर्व कलाकार मंडळी ५० कोटी रुपयांच्या पाठीमागे धावताना दाखवले आहेत. सिनेमात अनिल आणि माधुरी गुजराती जोडपं दाखवण्यात आले आहेत.

तगड्या विनोदी कलाकारांसोबत माकड क्रिस्टलही यात झळकणार आहे. क्रिस्टलने याआधी अनेक हॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे. ‘हँगओवर २’, ‘जॉर्ज ऑफ द जंगल’ आणि ‘नाइट अट दी म्युझियम’ सिनेमात या क्रिस्टलने काम केलं आहे.

सिनेमाशी निगडीत सूत्रांनी सांगितले की, या क्रिस्टलची सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तिच्यामुळे प्रेक्षक पोट धरून हसतील. येत्या २२ फेब्रुवारीला टोटल धमाल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First published: February 5, 2019, 3:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading