शनिवार ठरला 'HOT DAY', देशातील या 10 ठिकाणी आहे सगळ्यात जास्त उष्णता

शनिवार ठरला 'HOT DAY', देशातील या 10 ठिकाणी आहे सगळ्यात जास्त उष्णता

शनिवारी चंद्रपूरमध्ये 45.8 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गरमीमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मे : अंदमान निकोबारमध्ये अखेर मान्सूनने हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजासाठी आनंदवार्ता आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अंदमानात जरी मान्सून दाखल झाला असला तर भारतात उष्णतेचा लाट कायम आहे. शुक्रवारी तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये 40 अंशापर्यंत तापमान पोहचलं होतं.

सगळ्यात विशेष म्हणजे महाराष्ट्रातील चंद्रपूर हे देशातील सगळ्यात उष्ण शहर असल्याची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी चंद्रपूरमध्ये 45.8 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गरमीमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे.

संपूर्ण देशात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूरसह, ब्रह्मपूरीमध्ये 45.6, नागपूरमध्ये 45.4 आणि वर्धामध्ये 44.9 अंश सेल्शिअस तापमान आहे.  या राज्यांमध्ये उष्णतेचा तीव्र फटका बसत आहे. त्यामुळे उष्णाच्या चटक्यांमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील अकोल्यामध्ये उष्णाच्या झळा बसत आहेत. अकोल्यामध्ये 43.8 इतका उन्हाचा पारा चढला आहे. त्याचबरोबर देशातील तेलंगणा, कर्नाटक आणि झारखंडमध्येही तापमानात वाढ झाली आहे.

हेही वाचा: बळीराजासाठी आनंदवार्ता, मान्सून अंदमानात दाखल!

हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या अंदाजानुसार, अल निनोचा प्रभाव कमी असेल त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात दिलासा मिळू शकतो. त्यामुळे उष्णतेतून लवकर सुटका व्हावी यासाठी आणि शेतीच्या कामांना वेग मिळावा यासाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

जगातील सर्वात उष्ण शहरात विदर्भातील सहा शहरे...

1) अकोला – 2

2) ब्रम्हपुरी – 3

3) वर्धा – 5

4) चंद्रपूर - 6

5) अमरावती - 7

6) नागपूर - 8

कुठे होणार सगळ्यात कमी पाऊस

- स्कायमेटनं दिलेल्या अंदाजानुसार, यावर्षी बंगाल, बिहार, झारखंडमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडणार आहे.

- भारतामध्ये पूर्वेला 92 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. मध्य भारतात मान्सून 50 टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकतो.

राज्यात पुन्हा धडकणार उष्णतेची लाट, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2019 04:18 PM IST

ताज्या बातम्या