Elec-widget

निर्दयी! 6 वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या, शाळेच्या बेल्टने आवळला गळा

निर्दयी! 6 वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या, शाळेच्या बेल्टने आवळला गळा

पोलीस अधीक्षकांसह अन्य उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

  • Share this:

टोंक (राजस्थान), 01 डिसेंबर :  राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातून एक अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. येथे 6 वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्कारानंतर मुलीच्या स्वतःच्या शाळेच्या पट्ट्याने गळा आवळून खून करण्यात आला. रविवारी बाबुलच्या दाट झाडीमध्ये या निष्पाप चिमुरडीचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनाही देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांसह अन्य उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

शनिवारी पीडित मुलगी होती बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अलिगड पोलिस स्टेशन परिसरात घडली. बलात्कार आणि हत्या झालेली 6 वर्षांची मुलगी गावातील सरकारी शाळेत शिकत होती. शनिवारी शाळेच्या कार्यक्रमांमुळे ती शाळेतच होती. दुपारी 3 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने गावकरीही तेथे होते. त्यानंतर पीडित मुलगी घरी पोहोचली नाही. यावर, कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, परंतु तिचा काही पत्ता लागला नाही.

शाळेच्या पट्ट्याने गळा आवळून केला खून

रविवारी सकाळी ग्रामस्थांना खडली गावात मंदिराच्या पाठीमागे बाबूलच्या झाडीत एक निष्पाप रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. ही माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आणि गावकरी मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. मारेक्यांनी मुलीच्या शाळेच्या पट्ट्याने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. नराधमांनी इतक्या निर्दयी तिचा गळा आवळा की तिचे डोळेदेखील बाहेर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading...

उच्च अधिकारी पोहोचले घटनास्थळी

स्थानिकांच्या माहितीवरून पोलीस ठाण्यांसह अपर पोलीस अधीक्षक विपिन शर्मा यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची माहिती घेतली. पोलिसांनी मृतदेह सनाद शासकीय रुग्णालयात टोंक मुख्यालयात पाठविला आहे. एफएसएल टीमला घटनास्थळी बोलावले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, परंतु अद्यापपर्यंत आरोपीचा कोणताही क्लू सापडला नाही. त्याचबरोबर या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2019 04:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com