टोकयो, 6 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) ब्रॉन्झ मेडल जिंकण्याचं भारतीय महिला हॉकी टीमचं स्वप्न हुकलं आहे. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये खेळणाऱ्या भारतीय टीमचा 3-4 ने पराभव झाला.
ब्रॉन्झ मेडलच्या मॅचसाठी भारताचा सामना ग्रेट ब्रिटनशी (India vs Great Britain) होता. पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटननं जोरदार सुरुवात केली. मात्र भारताची गोल किपर सविता पुनियानं तितकाच जोरदार खेळ केला. सवितानं पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटनचे चार गोल अडवले. पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये 5 गोल
दुसरा क्वार्टर सुरु झाल्यानंतर अवघ्या 30 सेकंदामध्ये ब्रिटननं पहिला गोल करत भारतावर आघाडी घेतली. एलिना सियाननं गोल करत ब्रिटनचं खातं उघडलं. त्यानंतर ब्रिटननं आणखी एक गोल करत आघाडी घेतली. दोन गोलच्या पिछाडीनंतर भारताला गोल करण्याची गरज होती. गुरजीत कौरनं भारताकडून पहिला गोल केला.
भारतानं दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरवर करत बरोबरी साधली. त्यानंतर वंदना कटारियानं गोल करत भारताला 3-2 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 5 गोल झाले. यामध्ये ब्रिटननं 2 तर भारतानं 3 गोल केले.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाच मिनिटांनी ब्रिटनची कॅप्टन होली वेबनं गोल करत ब्रिटनला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये ब्रिटननं वर्चस्व होतं. त्यानी गोलपोस्टवर जोरदार हल्ला केला. मात्र गोल किपर सविता पुनियानं भक्कम बचाव करत गोल वाचवले. तिसरे क्वार्टर संपण्यासाठी काही सेकंद बाकी असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्यामध्ये भारताला गोल करता आला नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये ब्रिटननं त्यांचा चौथा गोल करत आघाडी घेतली.
फरहान अख्तरने पुरुष नाही तर महिला हॉकी टीमला दिल्या शुभेच्छा; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
भारतीय महिला टीमनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं इतिहास रचला होता. त्यापूर्वी साखळी सामन्यात पहिले तीन सामने सलग पराभूत झाल्यानंतर भारतीय टीमनं जोरदार कमबॅक केलं. आधी आयर्लंड आणि नंतर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिलांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. सेमी फायनलमध्ये अर्जेंटीनानं भारताचा 2-1 नं पराभव केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hockey, Olympics 2021