अवकाळी पाऊस ते राजकीय घडामोडी, जाणून घ्या आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या 13 बातम्या

अवकाळी पाऊस ते राजकीय घडामोडी, जाणून घ्या आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या 13 बातम्या

राज्यात परतीच्या पावासाने धुमाकूळ घातलं आहे तर दुसरीकडे सत्ता स्थापनेविषयी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या आणि यासह इतर महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात वाचा

  • Share this:

- आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानासंदर्भात ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे.

- राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे येत्या आठवडाभरात पूर्ण होतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. सरकारनं केलेले पंचनामेच ग्राह्य धरा असे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत आणि काही कारणास्तव पंचनामे होऊ शकले नाहीत तर शेतकऱ्यांनी फोटो काढून पाठवावेत, ते ग्राह्य धरले जातील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहाणी केली. तर त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या.

- मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते असंही त्यांनी म्हटलं. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटप झालं पाहिजे अशीही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.

- सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं नसून आमच्या समोर काही प्रस्ताव नसल्याचं शरद पवार यांनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या मुलाखत सांगितलं आहे. सेनेने केलेला सत्ता स्थापनेचा दावा शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर फुसका बार ठरला आहे. सेना आणि राष्ट्रवादी एकत्र सरकार स्थापन करायची काही शक्यता नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

- राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्षपदी उमेदवार उभा करणार असून. शिवसेना आणि भाजपला सत्ता स्थापन करता येत नसेल तर राष्ट्रवादी सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेईल असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

- मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल. तणावाची जी स्थिती निर्माण झालीय, ती निवळेल आणि योग्य वेळी युतीची सत्ता स्थापन होईल असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

- आदित्य ठाकरे सध्या लहान आहेत. त्यांचा अनुभवही कमी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाचा आग्रह शिवसेनेनं सोडावा, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. दरम्यान, अनुभव नसलेल्या आदित्य यांना मुख्यमंत्री बनवण्यात संजय राऊत यांचा काय स्वार्थ आहे, असा सवालही आठलले यांनी उपस्थित केला.

- औरंगाबाद इथं बनावट नोटा छापून कमी दरात विकणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एका उत्तरप्रदेशच्या आरोपीचा समावेश आहे. पुंडलिक नगर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 15 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटांचं मोठं आंतरराज्यीय रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

- पीएमसी बँक घोटाळा समोर आल्यानंतर आता आणखी एका खातेदाराचा मृत्यू झाला आहे. खारघरमधल्या विग कुटुंबीयातील 64 वर्षीय कुलदीप कोर यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. पीएमसी बँकेत 15 लाखांच्या ठेवी असल्यामुळे आता पैसे मिळतील की नाही या चिंतेनं कोर यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.

- महाराष्ट्र सरकारने दलित शब्दाऐवजी नवबौद्ध शब्द लावण्याचे काढलेले परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी भंडाऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं गेलं. रजिस्टर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि पंजिकृत बौद्ध समाज महाराष्ट्र युनिटच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं.

- बार्शीमध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानामध्ये मध्यरात्रीच्या सुमाराल अज्ञात चोरट्यांनी 6 किलो चांदी चोरून नेली. बार्शीतील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुकानातून ही चोरी झाल्याने मोठी खळबळ माजली. चोरट्यांनी दुकानातून सीसीटिव्ही कॅमेराही चोरून नेला. श्वान पथकाद्वारे या चोरट्यांचा शोध घेणं सुरू आहे.

- केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेली आयुष्यमान भारत योजनेचा जिल्ह्यात 6538 रुग्णांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्याच्या पाच रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले तर सामान्य रुग्णालाय वर्धा आणि सेवाग्राम रुग्णालाय येथे आयुष्यमान भारत योजना सुरु आहे. वर्धेच्या विकास भवन येथे खासदार रामदास तडस यांनी जिल्हा शल्य चिकित्सक पुरषोत्तम मडावी आणि सावंगी रुग्णलयाचे उदय मेघे यांच्या उपस्थितीत लाभार्थीशी संवाद साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 08:24 AM IST

ताज्या बातम्या