आजचा वार ठरणार राजकीय, या दिग्गजांच्या प्रचार सभा विधानसभेचा निकाल बदलणार?

आजचा वार ठरणार राजकीय, या दिग्गजांच्या प्रचार सभा विधानसभेचा निकाल बदलणार?

मतदानासाठी अवघे 2 दिवस उरले असल्यामुळे प्रचार सभांचा धडाका सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकांचं वार असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात मतदानासाठी अवघे 2 दिवस उरले असल्यामुळे प्रचार सभांचा धडाका सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. आजही दिग्गज नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रचार सभा होणार आहेत. ते नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. पाहुयात आज दिवसभरात काय असतील राजकीय घडामोडी...

- पंतप्रधान नरेंद्र मोदींची बीकेसी इथं संयुक्त सभा

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, जालना इथे सभा

- केंद्रीय रेल्वे, वाणिज्य, उद्योग मंत्री पीयुष गोयल यांची दु. 11 वा. पुण्यात पत्रकार परिषद

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर, भंडारा, मुंबई येथे सभा

- नितीन गडकरी यांच्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये 4 सभा

- उद्धव ठाकरे यांची साताऱ्यातल्या माणमध्ये भाजप उमेदवाराविरोधात प्रचार सभा

- राज ठाकरेंची पुण्यात कोथरुड मतदारसंघात संध्या. 7 वा. सभा

- सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद आणि येवला इथं सभा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2019 07:26 AM IST

ताज्या बातम्या